मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणाचा संबंध आता अमलीपदार्थांच्या तस्करीशी जोडला गेला आहे. ज्यात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अडकले आहेत, त्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोणानंतर आता बॉलिवूडची आणखी एक मोठी अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आली आहे. जवळपास ४० वर्षांच्या या अभिनेत्रीचे एका पाठोपाठ एक चित्रपट हिट झाले होते.
हि अभिनेत्री २००५-२००६ या काळात सुप्रसिद्ध होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या ड्रग्स पुरवणाऱ्या अनुज केशवानी आणि अंकुश यांची चौकशी केल्यानंतर या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. या चित्रपट अभिनेत्रिचा व्यवस्थापक या अभिनेत्रीकडे ड्रग्ज पोहचवत असत. या अभिनेत्रीची मॅनेजर ही अनुजची मैत्रीण होती.
दीपिकाची होणार चौकशी
या अभिनेत्रीसाठी सन २०१९ मध्ये खरेदी केलेल्या अमली पदार्थांची सविस्तर माहिती एनसीबीकडे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या मॅनेजरने अनुजशी एक ते दोन वेळा बैठकही घेतली होती. तर येत्या काही दिवसांत दीपिका पादुकोणला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
व्हाट्स अँपवरील संभाषणाने धक्कादायक खुलासा
एनसीबीच्या या तपासात दीपिका पादुकोण आणि जया साहाची मॅनेजर करिश्मा यांच्यात अमली पदार्थांसंबंधी झालेले व्हॉटस अँप संभाषण समोर आले आहे. तसेच जया साहा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यातील गप्पा देखील समोर आल्या आहेत, ज्यात श्रद्धा कपूर जयाकडून सीबीडी ऑइल मागत होती. गप्पांच्या वेळी काही इंग्रजी अक्षरे कोड म्हणून वापरली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोड्सनुसार डी एन एस के म्हणजे डी म्हणजे दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा प्रकाश.
Join Our WhatsApp Community