शेवग्याच्या शेंगांची (Drumsticks) आमटी अनेकांना आवडते. याच शेवग्याच्या पानांचे फायदे मात्र फार कमी लोकांना माहिती असतात. प्रत्येक जण वाढत्या वयानंतरही तरुण आणि तंदुरुस्त होऊ इच्छितो. त्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही शेवग्याच्या पानांचा रस प्यायलात, तर तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहाल. (Drumsticks Leaf Benefits)
(हेही वाचा – North Central Lok Sabha Constituency : भाजपच्या ‘या’ संभाव्य उमेदवाराची शक्यता)
- शेवग्याची पाने शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्ही त्याच्या पानांचा रस बनवला आणि दररोज त्याचे सेवन केले, तर तुमचे वजन कमी होईल आणि तुम्ही नेहमी तंदुरुस्त रहाल.
- मधुमेहाच्या रुग्णाने याचे सेवन केले पाहिजे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
- शेवग्याची पाने खाल्ल्याने शरीर बळकट होण्यास मदत होते. यात कॅल्शियम (Calcium) आणि मॅग्नेशियम (magnesium) भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
- शेवग्याच्या पानांचा वापर शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ते रक्त निर्जंतुक करण्यास मदत करतात.
- शेवग्याच्या पानांच्या रसाने पोटाच्या सर्व समस्यांपासून दूर रहाता येते. (Drumsticks Leaf Benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community