Dudhsagar Waterfall Goa : भारतातल्या सर्वांत उंच दूधसागर धबधब्याला जायचे असेल, तर हा लेख वाचाच

1473
Dudhsagar Waterfall Goa : भारतातल्या सर्वांत उंच दूधसागर धबधब्याला जायचे असेल, तर हा लेख वाचाच
दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) हा भारतातल्या सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक आहे. त्याची उंची ३१० मीटर म्हणजेच १०१७ फूट इतकी आहे. तसेच त्याची सरासरी रुंदी ३० मीटर म्हणजेच १०० फूट इतकी आहे. हा दूधसागर धबधबा गोव्यातल्या भगवान महावीर अभयारण्य आणि पश्चिम भागातल्या मोलेम राष्ट्रीय उद्यानाच्या भागापर्यंत पसरलेला आहे. हा धबधबा मांडोवी नदीच्या पश्चिम घाटापासून ते पणजीपर्यंतच्या प्रवासात थोड्या थोड्या अंतराने पाहायला मिळतो. पुढे तो अरबी समुद्रात विलीन होतो. (Dudhsagar Waterfall Goa)
या धबधब्याच्या सानिध्यात येणारा संपूर्ण परिसर भरपूर प्रमाणात जैववैविध्य असलेल्या पानगळीच्या जंगलांनी वेढलेला आहे. इतर ऋतूंच्या प्रमाणात पावसाळ्यात हा दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) अतिशय मनमोहक दिसतो. पावसाळ्यात पावसाने भरून वाहणारा धबधबा पाहताना पाण्याची एक मोठ्ठाली चादरच वरून खाली येतेय असं वाटतं. हा धबधबा पणजीपासून साठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तसेच बेळगाव ते वास्को द गामा या रेल्वे मार्गावरून मडगावच्या पूर्वेकडे ४६ किलोमीटर तर बेळगावच्या दक्षिणेला ८० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. (Dudhsagar Waterfall Goa)
कॅसल रॉक हे धबधब्याजवळचं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वेस्टेशनपासून दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्यावरून प्रवास करता येतो. कर्नाटकातील उत्तर कन्नड येथूनही दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटक रेल्वेने प्रवास करू शकतात. ते दूधसागर रेल्वे स्टेशनवर उतरू शकतात. दूधसागर रेल्वे स्टेशनवर फलाट नाही. इथे प्रवाशांना रेल्वे गाडीतून चढ-उतर करताना एका मोठ्या शिडीचा वापर करावा लागतो. त्यानंतर धबधब्यावर पोहोचण्यासाठी रेल्वे रुळांवरून एक किलोमीटर एवढ्या अंतरावर चालावं लागतं. एखाद्या लोकप्रिय पर्यटन स्थळावर जाताना आपण कितीही चालू शकत असलो तरीही या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रुळावरच्या रस्त्यावर एक दोनशे मीटर लांबीचा काळोखा बोगदा लागतो. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणं हे जरा कठीणच आहे. (Dudhsagar Waterfall Goa)
अलीकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशांना दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) या रेल्वे स्टेशनवर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी बंदी घातली आहे. या स्टेशनवर चढणे-उतरणे हा कायद्याने गुन्हा आहे. गोव्याच्या कोलेम नावाच्या गावाजवळ भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आहे. त्या अभयारण्याच्या असोसिएशनच्या टॅक्सीच्या मदतीने दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचता येतं. त्या असोसिएशनतर्फे नेण्यात येणाऱ्या टॅक्सीने पर्यटकांना हिरवेगार जंगल आणि जोरात वाहणाऱ्या ओढ्यांच्या प्रवाहांतून जाता-येता येतं. सध्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. अभयारण्याच्या असोसिएशनतर्फे जाण्याचा प्लस पॉइंट म्हणजे पर्यटकांना दूधसागर धबधब्याचे संपूर्ण दृश्य पाहता येते. (Dudhsagar Waterfall Goa)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.