ओमिक्रॉनचा धोका! जाणून घ्या हवाई प्रवासाबाबतची नवी नियमावली

109

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत आले असून नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण देशात भितीचे वातावरण आहे. या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी ओमिक्रॉनसंबंधित सतर्कता बाळगत हवाई प्रवासाबाबतची नवी नियमावली अर्थात सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या सुधारित गाईडलाईन्सनुसार, नव्या व्हेरियंटच्या संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे. दरम्यान केंद्रानंतर आता राज्य सरकारनेही परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास…

ओमिक्रॉनच्या प्रादुर्भाव लक्षात घेता, त्याचा देशात शिरकाव होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रापाठोपाठ राज्याने नवी नियमावली जाहीर केली आली आहे. अधिक धोकादायक असणाऱ्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नियम कडक करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली. कोणी विनामास्क आढळल्यास त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड तर विना मास्क ग्राहकाला सामान दिल्यास दुकानदारांकडून तब्बल 10 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – राज्यात प्राथमिक शाळांसाठी नवी नियमावली! आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय)

केंद्र सरकारची नवी ट्रॅव्हल गाईडलाईन्स

  • विमान वाहतूक मंत्रालयानुसार, आजपासून सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 14 दिवसांचा ट्रॅव्हल हिस्ट्री देणं बंधनकारक
  • संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून भारतात येण्यासाठी नागरिकांना प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणं अनिर्वाय
  • गेल्या 15 दिवसांत आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार
  • संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार

राज्य सरकारची नवी ट्रॅव्हल गाईडलाईन्स

  • जर परदेशातून राज्यात यायचे असल्यास गेल्या 15 दिवसांमध्ये कुठे प्रवास केला, त्याचा तपशील देणे बंधनकारक
  • आरटीपीसीआर चाचणी झाल्यानंतरच प्रवाशांना विमानतळाच्या बाहेर पडता येणार
  • चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल किंवा 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात येणार
  • राज्यांतर्गत हवाई प्रवास करायचा असेल तर कोरोना लसीचे दोन डोस, किंवा प्रवासाच्या 48 तास आधीचे कोरोना चाचणी निगेटिव्हचे प्रमाणपत्र सक्तीचे
  • रराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हेच नियम लागू राहणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.