Dwarkadhish Temple : द्वारकाधीश मंदिरात जायचंय? पण कसं जायचं माहिती नाही? मग हा लेख वाचा

89
Dwarkadhish Temple : द्वारकाधीश मंदिरात जायचंय? पण कसं जायचं माहिती नाही? मग हा लेख वाचा

असे म्हटले जाते की प्राचीन काळी द्वारका शहराचे नाव कुश स्थली असे होते. कारण येथे कुश नावाचा राक्षस राहत होता, ज्याचा भगवान विक्रमने याच ठिकाणी वध केला होता. परंतु या शहरात अनेक दरवाजे असल्यामुळे या शहराला द्वारका असे नाव पडले. अनेक पुराणांमध्ये द्वारका शहराचे प्राचीन नाव सुवर्ण द्वारका मानले गेले आहे कारण या शहरात प्रवेश करण्यासाठी एक मोठा सुवर्ण दरवाजा होता. (Dwarkadhish Temple)

या ठिकाणी पहिले मंदिर श्रीकृष्णाचा पणतू वज्रनाभ याने बांधले होते असे मानले जाते. पण मंदिराला सध्याचे स्वरूप १६ व्या शतकात प्राप्त झाले. द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर रुक्मिणी माताचे निर्जन मंदिर आहे. असे म्हणतात की दुर्वासाच्या शापामुळे त्यांना एकांतवासात राहावे लागले. (Dwarkadhish Temple)

(हेही वाचा – Mogra Flower : घरी मोगर्‍याचे रोप कसे लावाल आणि कशी घ्याल काळजी?)

मंदिराच्या शिखरावर आहे हा ध्वज 

हे मंदिर सुमारे २००० वर्षे जुने असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. हे द्वारकाधीश मंदिर (Dwarkadhish Temple) जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची रचना पाच मजली आहे आणि संपूर्ण मंदिर ७२ खांबांवर उभं आहे, मंदिराचे शिखर सुमारे ७८ मीटर आहे. मंदिराची एकूण उंची अंदाजे १५७ फूट आहे. या मंदिराच्या शिखरावर चंद्र आणि सूर्याचा आकार असलेला ध्वज आहे. या ध्वजाची लांबी ५२ गंज इतकी आहे, हा ध्वज अनेक मैल लांबून दिसतो. ध्वज दररोज तीन वेळा बदलला जातो. प्रत्येक वेळी वेगळ्या रंगाचा ध्वज फडकवला जातो. (Dwarkadhish Temple)

आता इतकं सुंदर आणि भव्य मंदिर पाहायचं असेल तर तिथे कसं पोहोचायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर भाविकहो, आज आम्ही तुम्हाला मंदिराच्या मॅपबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. येथील सर्वात जवळचे विमानतळ जामनगर विमानतळ आहे, जे मंदिरापासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. द्वारका येथे एक छोटेसे रेल्वे स्टेशन देखील आहे, जे राज्यातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. हे रेल्वे स्टेशन ३ किमी अंतरावर आहे. येथे बसनेही जाता येते. याशिवाय तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनानेही येथे पोहोचू शकता. एनएच-९४७ द्वारे तुम्ही थेट या मंदिरात पोहोचू शकता. (Dwarkadhish Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.