असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल देखील सुरू केलं आहे. ई-श्रम पोर्टलचा उद्देश हा असंघटित कामगारांचा डेटाबेस गोळा करणं आणि त्यांना विविध सरकारी योजनांचे फायदे करून देणं हा आहे. (e shram card benefits)
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करावा. जेणेकरून ई-श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना वयाच्या ६०व्या वर्षांनंतर पेन्शन, मृत्यू विमा, अपंगत्वाच्या बाबतीत आर्थिक मदत इत्यादी वेगवेगळे आर्थिक फायदे मिळू शकतात. ई-श्रम कार्डचा उद्देश असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलद्वारे सर्व नवीन सरकारी योजना आणि सुविधांमध्ये प्रवेश प्रदान करणे हा आहे. (e shram card benefits)
(हेही वाचा – शिवसेनेच्या आमदाराकडून Kunal Kamra च्या ‘माज’वर कारवाईचा इशारा)
ई-श्रम कार्डचा तपशील
- योजनेचं नाव – e-श्रम कार्ड
- कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केलं.
- सुरुवात झाली ती तारीख – ऑगस्ट २०२१
- लाभार्थी – असंघटित क्षेत्रातलं सर्व कामगार
- निवृत्ती वेतन लाभ – प्रति महिना ₹३,०००
- विमा लाभ अंशिक अपंगत्वासाठी ₹१ लाख
- मृत्यू विमा ₹२ लाख
- वयाची मर्यादा १६-५९ वर्षे
- अधिकृत वेबसाइट –
- हेल्पलाइन क्रमांक १४४३४ (e shram card benefits)
(हेही वाचा – aiims recruitment २०२५ साठी किती शुल्क आकारले जाईल?)
ई-श्रम कार्डचे फायदे
- वयाची ६० वर्षं पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹३,००० पेन्शन.
- कामगाराच्या आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत ₹१,००,००० आर्थिक मदत आणि ₹२,००,००० मृत्यू विमा
- जर एखाद्या लाभार्थीचा (ई-श्रम कार्ड असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगाराचा) अपघातामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या पती/पत्नीला सर्व फायदे मिळतील.
- लाभार्थ्यांना संपूर्ण भारतात वैध असलेला १२-अंकी UAN क्रमांक मिळेल. (e shram card benefits)
(हेही वाचा – भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या; Adv. Ashish Shelar यांची केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती)
ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्रता
- कोणताही असंघटित कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.
- कामगारांचे वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान असावे.
- कामगारांचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडलेला आणि वैध असावा.
- कामगार आयकरदाता नसावेत. (e shram card benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community