Earphones/Headphones : इयरफोन की हेडफोन…कानांसाठी जास्त धोकादायक काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

इयरफोन आणि हेडफोन दोन्हींचा कानावर परिणाम होऊ शकतो

205
Earphones/Headphones : इयरफोन की हेडफोन...कानांसाठी जास्त धोकादायक काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Earphones/Headphones : इयरफोन की हेडफोन...कानांसाठी जास्त धोकादायक काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

इयरफोन्स आणि हेडफोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या दोन्हीपैकी जे आवडतं ते बराच वेळ कानांना लावून लोकं मोठ्या आवाजात ऐकत असतात, बोलत असतात. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन बहिरेपण येऊ शकते. कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. काही जणांना असे वाटते की, इयरफोन्सच्या तुलनेत हेडफोन्सचा वापर कमी धोकादायक असतो. काही जणांना इयरफोन्स वापरणे योग्य वाटते. जाणून घेऊया, इयरफोन्स आणि हेडफोन यांचा कानांवर नेमका काय परिणाम होतो. दोन्हीपैकी नेमके काय धोकादायक आहे, जाणून घेऊया.

(हेही वाचा –Chandrayaan-3 Photoshoot : ‘चंद्रयान-२’ ने काढले ‘चंद्रयान-३’ चे फोटो, चंद्राच्या कक्षेतून असे दिसते विक्रम लॅंडर)

ईएनटी तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, बराच वेळ ईयरफोन कानांना लावून ऐकल्यास नॉइस इंड्युस्ड हियरिंग लॉस (NIHL)होण्याचा धोका वाढतो. शहरात आवाजाची पातळी डब्ल्यूएचओच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने दीर्घकाळ इयरफोनचा वापर केला तर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फारच कमी वेळासाठी इयर फोन्सचा वापर करा. जर तुम्हाला बराच वेळ मीटिंग, एखादे व्याख्यान किंवा गाणी ऐकायची असतील तर हेडफोन वापरणे चांगले.

इअरफोन किंवा हेडफोनचा आवाज किती असावा?

ईएनटी तज्ज्ञ इयरफोन आणि हेडफोनचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला देतात. या दोन्ही तांत्रिक उपकरणांचा कमाल व्हॉल्यूम 60% पेक्षा कमी असावी. जर तुम्ही त्यांचा खूप वापर करत असाल, तर वेळोवेळी कान तपासत राहा. यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या अगोदरच ओळखून त्यावर उपचार करणे शक्य होईल. इयरफोन आणि हेडफोन दोन्ही कानावर परिणाम करू शकतात. त्यामुळे दोन्हींचा काळजीपूर्वक वापरणे आणि कमीतकमी वापर करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.