कानात इअरफोन घालून आपल्याच धुंदीत वावरणाऱ्या तरुण आणि तरुणींना अनेकदा आपल्या या चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय मुलासोबत घडली आहे. खूप वेळ कानात घातलेल्या टीडब्लुएस (Tws) या इअरफोनमुळे त्याची ऐकण्याची क्षमता कमी झाली. तासनंतास कोणत्याही डिवाइस (device)चा वापर केल्याने त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. यामुळे आपल्या कानांना नुकसान पोहचू शकते.
(हेही वाचा – यशस्वी होण्यासाठी मेहनत करताय, पण मेंदूचे काय?)
टीओआय (TOI)च्या रिपोर्टनुसार, इअरफोनचा जास्त काळ वापर केल्यामुळे त्या मुलाच्या कानांच्या पडद्यावर (Eardrum) परिणाम होऊन त्याला ऐकू येणे बंद झाले. परंतु ऑपरेशन (operation)नंतर त्याची बंद झालेली ऐकण्याची क्षमता पुन्हा एकदा सुरू झाली. इअरफोनचा अतिरेकी वापर केल्याने कानाच्या पडद्यांना हानी पोहोचून त्यात जंतू (Germs) आणि व्हायरस (virus) होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, कानाच्या नळीला हवेशीर ठेवणे गरजेचे आहे. तसे न केल्यास कानात घाम येऊन संसर्ग (infection) होऊ शकतो. त्यामुळे गंभीर समस्येलाही तोंड द्यावे लागू शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community