हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायची आहे? तर ‘हे’ फळ खा!

101

हिवाळ्यात सर्दी, हिवताप, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही संत्र हे फळाचे सेवन करू शकता. व्हिटॅमिन सी, मिनर्लस, अँटीऑक्सिडंट अशा विविध गुणांनी परिपूर्ण असे संत्री हिवाळ्यात अनेक आरोग्य समस्या उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, निस्तेज त्वचा व कोरडे केस अशा सर्व समस्या सोडवण्यास सक्षम आहे.

आरोग्यास उत्तम

अनेक लोक फक्त आवड किंवा आंबट गोड चवीमुळे संत्री खाणे पसंत करतात, पण संत्र्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. संत्र्यांमधील फायटोकेमिकल्स आपल्याला हृदयरोग आणि कर्करोगापासून वाचवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, संत्री तुमचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात. हे लिंबूवर्गीय फळ अपचन, पोटदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते. संत्री शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. तसेच डोळ्यांसाठीही उत्तम असतात.

(हेही वाचा अरेच्चा! भारतीयांना मिळताहेत श्रीलंकन डोळे)

त्वचेसाठी उपयुक्त

हिवाळा प्रामुख्याने संत्री या फळांचा कालावधी आहे. संत्र्यामुळे त्वचा तजेलदार होते. गृहिणी संत्र्यांची साल सुकवून फेस पॅक आदींची निर्मिती करतात. संत्र्यांमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचेवरील रोमछिद्रांची खोलवर स्वच्छता होते. रोगप्रतिकारशक्ती व त्वचेच्या उपयुक्तेसाठी संत्र हे फळ अतिशय उपयुक्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.