पिस्ता हा नेकांना आवडणारा उत्कृष्ट सुकामेवा आहे. (Health Tips) विविध प्रकारच्या मिठाई सजवण्यासाठीही याचा वापर केला जातो. पिस्ता उष्ण असतो. विशेषतः हिवाळ्याच्या हंगामात पिस्ता खाण्याची शिफारस केली जाते. दररोज पिस्ता का खाल्ला पाहिजे, हे याविषयी आहारतज्ञ सांगतात. (Health Tips)
पिस्ते खाण्याचे फायदे
- पिस्तामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत होते. त्यात फेनोलिक संयुगे, कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्याचा मधुमेहींना लाभ होतो.
- पिस्ता झेक्सॅन्थिन आणि ल्युटिनने समृद्ध असतात, जे तुमच्या डोळ्यांचे वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे दृष्टी वाढवते, तसेच मोबाईल आणि लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करते. (Health Tips)
(हेही वाचा – Gram panchayat Election Result : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत तेलंगणातील बीआरएसची एन्ट्री)
- ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी पिस्ता हा खाण्याचा एक चांगला पर्याय आहे. जर ते मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते वजन कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल.
- पिस्ता हे फायबरने समृद्ध आहे, जे चांगले पचन करण्यास मदत करते. जर तुम्ही ते खाल्ले, तर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत.
- नियमितपणे पिस्ता खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. ते रक्तदाब सहजपणे नियंत्रित करते, त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदयरोगाचा धोका कमी होतो. (Health Tips)
पिस्ते कधी खावेत ?
जेव्हा पिस्ता खाता, तेव्हा वेळेकडे लक्ष ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खा. जरी तुम्ही रोज रिकामे पिस्ते खाण्याचा विचार करत असाल, तर रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजवलेले पिस्ते खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले राहील.
एका दिवसात किती पिस्ते खावेत ?
उन्हाळ्यात पिस्ते खाणे टाळावे. तुम्ही एका दिवसात 15-20 ग्रॅम पिस्ता खाऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीने ते जास्त प्रमाणात खाल्ले, तर यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते. (Health Tips)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community