असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांचे अनेक आजार होत आहेत. अशातच हे काही खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केले तर म्हातारपणातही डोळे निरोगी राहू शकतात. डोळे आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे.ज्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला आंधळेपणा येऊ शकतो. म्हातारपणातही आपले डोळे निरोगी राहावे असे वाटत असेल तर आहार आणि जीवनशैली यांची नियमित काळजी घ्यायला हवी. निरोगी डोळ्यांसाठी काय खायला हवे जाणून घेऊया. (Health Tips )
डोळ्यांसाठी हे पदार्थ आहेत फायदेशीर :-
१. निरोगी डोळ्यांसाठी आजच आपल्या आहारात बदामाचा समावेश करा. यामध्ये व्हिटामिन ए आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. रोज सकाळी ५ ते ६ बदाम तुमचे डोळे निरोगी ठेवू शकते.
२. रोज एक बीट खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यात बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळे निरोगी राहतात. डोळ्यांची ड्रायनेस बीट खाल्याने कमी होऊ शकते.
३. मियामी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते. ते डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांची दृष्टी टिकून राहते.
४. बीन्सचा ही समावेश रोजच्या आहारात करायला हवा. यात फ्लेवोनॉइ़ड आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे बुबुळ निरोगी राहतात.
५. संत्री , द्राक्षे , लिंबू ही फळे जास्त खावीत. या फळांमध्ये व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी याचे प्रमाण भरपूर असते. खूप काळ असणारा मोतिबिंदू देखील कमी होऊ शकतो.
६. भुईमुगात व्हिटामिन ए असते. जे डोळ्यातील फ्री रेडिकल निरोगी ठेवण्यास मदत करते.
७. तुमच्या आहारात माशांचाही समावेश केला पाहिजे. त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात जे मोतीबिंदूचा धोका कमी करण्यासाठी कामी येते. ओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या सर्वोत्तम स्त्रोतांमध्ये ट्यूना, कॉड, सॅल्मन यांचा समावेश असू शकतो. आठवड्यातून किमान दोनदा मासे खाल्ल्यास डोळ्यांना पोषण मिळू शकते.