Cashew For Heart : काजूचे सेवन टाळू शकते ह्रदयविकाराचा झटका !

239
Cashew For Heart : काजूचे सेवन टाळू शकते ह्रदयविकाराचा झटका !
Cashew For Heart : काजूचे सेवन टाळू शकते ह्रदयविकाराचा झटका !

सामान्यतः असे मानले जाते की, ”आहारातील कोलेस्ट्रॉल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि परिणामी हृदयविकाराचा धोका संभवतो.” परंतु अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, ”आहारातील कोलेस्ट्रॉलचा हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याशी काही संबंध नाही. (Cashew For Heart) खरे तर यकृताच्या जास्त उत्पादनाचा परिणाम रक्तातील कोलेस्ट्रॉलवर दिसून येतो. सोप्या शब्दांत सांगायचे, तर तुम्ही दिवसाला एक अंडे खात असाल, तर ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची संख्या वाढवेल, असा विचार करून काळजी करण्याची गरज नाही.

(हेही वाचा – Motorman Viral Video : लोकल प्रवाशांनी नेहमीच्या मोटरमनला ‘असा’ दिला निरोप)

आहारातील कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्ही सेवन करीत असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण. आहारातील कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलच्या संख्येपैकी एक-तृतियांश योगदान देते. उर्वरित दोन-तृतियांश यकृताद्वारे तयार केले जाते. आता ही पातळी वाढली, तर ती यकृताच्या जास्त उत्पादनामुळे. म्हणूनच माझे काही रुग्ण मला म्हणतात, “डॉक्टर, मी फॅट्सचे पदार्थ खात नाही. तरीही माझ्या रक्तातील कोलेस्ट्रॉल जास्त आहे, असे दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे प्रधान संचालक डॉ. निशिथ चंद्रा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ”आहारातील कोलेस्ट्रॉल हे प्राण्यांवर आधारित अन्न, सामान्यतः मांस, अंडी, लोणी व पूर्ण फॅटसयुक्त दुग्धजन्य पदार्थांपासून मिळते. ते तुम्हाला प्रक्रिया केलेले मांस, सॉसेज, बर्गर आणि अगदी बेक केलेल्या वस्तूंमध्येही भरपूर प्रमाणात मिळेल. परंतु, जर तुम्हाला कॉमोरबिडीटीज (इतर आजार) असतील किंवा आनुवांशिकदृष्ट्या जास्त कोलेस्ट्रॉलचा धोका असेल किंवा तुमचे यकृत जास्त पातळीमध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण करीत असेल, तर चांगल्या आरोग्यासाठी ते माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे.” (Cashew For Heart)

नट्सपासून म्हणजे जे सुका मेवा म्हणून आपण जे पदार्थ सेवन करतो, त्यात कोलेस्ट्रॉल असते, असा एक समज आहे.” पण यापैकी कशामध्येच कोलेस्ट्रॉल नाही. दूध, लोणी, चीज व अंडी यांसारख्या सर्व प्राणी आधारित उत्पादनांमध्ये कोलेस्ट्रॉल असते. शेंगदाणे आणि काजूमध्येही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शून्य असते. खरे तर, काजू खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात त्याचबरोबर त्यांच्यातील उच्च मॅग्नेशियम तत्त्वांमुळे हृदयरोगही टाळू शकतात. मॅग्नेशियम हे इस्केमिक हृदयरोग (Ischemic Heart )आणि स्ट्रोकची शक्यता कमी करण्यासाठी ओळखले जातात, असे डॉ. निशिथ चंद्रा सांगतात.

आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन किती प्रमाणात करावे, याविषयी बोलताना ते म्हणाले, तुमच्या आरोग्याशी निगडित सर्व संख्या आणि मार्कर सामान्य श्रेणीत आहेत, असे गृहीत धरून तुम्ही आहारातील कोलेस्ट्रॉल दररोज १०० ते २०० मिलिग्रॅम सुरक्षितपणे घेऊ शकता. परंतु, जर ते जास्त असेल, तर आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन कमी करा. लक्षात ठेवा, आपण मध्यम प्रमाणात खाणे आवश्यक आहे. याशिवाय, कोलेस्ट्रॉल असलेल्या काही प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही सॅच्युरेडेट फॅट्सचे (saturated fat) प्रमाण जास्त असते. याला अपवाद फक्त अंडी आणि शेलफिश आहेत. मध्यम ॲरोबिक व्यायाम, अधिक फळे व हिरव्या पालेभाज्या खाणे, ऑलिव्ह ऑइल आणि प्रथिने समृद्ध असलेल्या मेडिरटेरिअन आहाराचे (Mediterranean diet) अंदाजे सेवन करणे आणि योग्य झोपेची खात्री करून तुम्ही प्लेक तयार करणे कमी करू शकता. (Cashew For Heart)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.