आजच्या इन्स्टंट आणि फास्ट लाईफ स्टाईलमध्ये फास्ट फूड हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग होऊन बसला आहे. फास्ट फूड चवीला जितके चविष्ट तितकेच आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशातच सॅन्डविच, फ्रेंच फ्राईस आणि बऱ्याच पदार्थांसोबत खाल्ला जाणारा टोमॅटो केचप आपल्या शरीरासाठी फार हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
टोमॅटो सॉस खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि साखरेचे प्रमाण वाढते. केचप बनवण्यासाठी केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. केचपमध्ये साखरेसोबत भरपूर मीठ असते. जास्त मिठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. केचप हा एक आम्लयुक्त पदार्थ आहे. केचप खाल्याने किडनीवरही वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र नुसत्या टोमॅटोचे सेवन आरोग्यास उपयुक्त आहे. टोमॅटो सूप, भाजी, सॅलड, चटणी इत्यादी पदार्थ आपण खाऊ शकतो.
(हेही वाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सिल्वर ओकवर बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा)
Join Our WhatsApp Community