Screen Time Problems : वाढलेल्या ‘स्क्रीन टाईम’चे दुष्परिणाम !

ज्या गोष्टी ऑफलाईन शक्य आहेत, त्याही ऑनलाईन केल्यामुळे हा जीवनकौशल्य विकास होण्यास अडचण येते, असे तज्ञ सांगतात.

466
Screen Time Problems : वाढलेल्या 'स्क्रीन टाईम'चे दुष्परिणाम !
Screen Time Problems : वाढलेल्या 'स्क्रीन टाईम'चे दुष्परिणाम !

भारतातल्या माणसांचा स्क्रीन टाईम (Screen Time Problems) दिवसाला ७ तास १८ मिनिटे इतका आहे. यात सर्व प्रकारचे स्क्रीन्स आले. कोविडनंतर मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. भारतीय माणसाचा सरासरी स्क्रीन टाइम जरी ७ तासांचा असला तरी माणसं झोपतात तेवढीच स्क्रीन पासून दूर असतात, असे म्हणायला हरकत नसते. मुळात मोबाईल, टीव्ही किंवा टॅबचा स्क्रीन कशासाठी वापरायचा आणि कशासाठी नाही, याचा ताळमेळ अजूनही आपल्याला घालता येत नाही. शालेय मुलांच्या संदर्भात अनेक जीवनकौशल्ये विकसित होत असतात, पण ज्या गोष्टी ऑफलाईन शक्य आहेत, त्याही ऑनलाईन केल्यामुळे हा जीवनकौशल्य विकास होण्यास अडचण येते, असे तज्ञ सांगतात.

(हेही वाचा – D Gukesh Replaces V Anand : विश्वनाथन आनंदची ३७ वर्षांची सद्दी मोडून डी गुकेश बनलाय भारताचा अग्रमानांकीत बुद्धिबळपटू)

एका अभ्यासाअंती तज्ञ आवाहन करतात की, स्क्रीन टाइम (Screen Time Problems) किती हवा, यापेक्षाही आपल्याला सतत मोबाईल लागत नाही हे मान्य करणे आताच्या घडीला अत्यावश्यक आहे. मोबाईल आपण कशासाठी वापरायचा, कशासाठी वापरायचा नाही या डिजिटल विवेकाचा भाग आहे. त्यावर मोठ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा, असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.

मोबाईल सतत वापरण्याचे दुष्परिणाम !

१. सतत गेमिंग किंवा चॅटिंग करणाऱ्या मुलांमध्ये नजरेला नजर न देता येण्याची समस्या दिसून येते. त्यांची नजर सतत भिरभिरत असते कारण अशा संवादाची त्यांची सवयच मोडून जाते.

२. मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि टीव्ही यांचा वापर मिळून तुमचा दिवसाचा स्क्रीन टाईम ठरतो. त्यामुळे तो किती असावा असा विचार जेव्हा कराल, तेव्हा या सगळ्याचा एकत्रित विचार आवश्यक आहे. कशासाठी स्क्रीन वापरात आहात, तुमचा हेतू काय आहे, याची स्पष्ट कल्पना असायला हवी. अनेकदा निर्हेतुक आणि उगीचच सतत मोबाईल बघितला जातो. त्यामुळे स्क्रीनसमोर वेळ देण्यामागचा उद्देश स्पष्ट हवा. अति स्क्रीन टाईममुळे शारीरिक आणि मानसिक समस्या तयार होतात. झोपेच्या समस्या, पाठदुखी, डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी अशा प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. नैराश्य, अस्वस्थपणा, रागीटपणा, सतत उदास वाटणं अशा स्वरूपाच्या मानसिक समस्याही उद्भवतात.

३. मुलांच्या आकलन कौशल्यावरही अति स्क्रीन टाईमचा परिणाम होतो. एखाद्या गोष्टीचे आकलन, विचार करणे, विश्लेषण करणे, वाचन, भाषा, स्मृतीवरही अनेकदा अतिस्क्रीन टाईमचा परिणाम होतो.

४. मुलांच्या संदर्भात एकाग्रता नष्ट होणे, लक्ष न लागणे, सलगपणे एखादी गोष्ट करता न येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

५. शाळेत गृहपाठ जेव्हा दिला जातो, तेव्हा तो लिहून घेणे, व्यवस्थित लिहून घेणे किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना नीट समजून घेणे, त्याप्रमाणे गृहपाठ पूर्ण करणे ही सगळी जीवनकौशल्ये आहेत. करोना काळात जेव्हा शाळा ऑनलाईन गेल्या तेव्हा मुलांना सोयीसाठी गृहपाठ whatsapp वर दिला जायचा. पण शाळा परत ऑफलाईन सुरु झाल्यानंतरही या गोष्टी आजही अनेक शाळांमध्ये सुरु आहे. शाळेतून मिळालेला ऑनलाईन अभ्यास, गृहपाठ बघण्यासाठी म्हणून मुलं पालकांकडे मोबाईल मागतात. गृहपाठ बघणे ही ५-७ मिनिटांची फारतर फार गोष्ट असते पण हातात मोबाईल आला की रील्स बघत बसणं, गेमिंग करत बसणं या गोष्टी सुरु होतात आणि त्यात वेळ जायला लागतो. (Screen Time Problems)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.