Electric Vehicle : शुद्ध हवा व खर्चामधील बचतीसाठी स्‍मार्ट पुढाकार

61
Electric Vehicle : शुद्ध हवा व खर्चामधील बचतीसाठी स्‍मार्ट पुढाकार
Electric Vehicle : शुद्ध हवा व खर्चामधील बचतीसाठी स्‍मार्ट पुढाकार

बाकू, अझरबैजानमध्‍ये सीओपी २९ (COP29)ची सुरूवात होताच हवेचा दर्जा खालावण्‍याच्‍या संकटाचा सामना करत असलेल्‍या भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, जे अत्‍यंत चिंताजनक आहे. जगातील अव्‍वल १०० सर्वात प्रदूषित शहरांपैकी ८३ शहरे भारतात आहेत, जेथे वायू प्रदूषणाचा दररोज ५ वर्षांखालील ४६४ मुलांवर परिणाम होत आहे. हा सायलण्‍ट किलर आता तंबाखू व मधुमेहापेक्षा मृत्‍यूचे प्रमुख कारण बनला आहे, ज्‍यामुळे २०४७ पर्यंत विकसित अर्थव्‍यवस्‍था बनण्‍याच्‍या भारताच्‍या महत्त्वाकांक्षांमध्‍ये अडथळा येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे.

या संकटामधील प्रमुख कारणीभूत घटक म्‍हणजे वाहनांमधून होणारे उत्‍सर्जन. संपूर्ण विश्‍व शाश्‍वत गतीशीलतेला प्राधान्‍य देत असताना इलेक्ट्रिक वेईकल्‍स (Electric Vehicle) महत्त्वपूर्ण सोल्‍यूशन ठरल्‍या आहेत. नॉर्वे, चीन, जर्मनी यांसारख्‍या देशांनी ईव्‍हींचा अवलंब केला आहे आणि आपला शेजारी देश नेपाळ देखील मोठी प्रगती करत आहे. भारतात बदल होत आहे, जेथे ईव्‍ही मूल्‍याप्रती जागरूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

(हेही वाचा – Dominica या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना जाहीर)

मुंबईत, तसेच महाराष्‍ट्राच्‍या इतर भागांमध्‍ये ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन्‍स किंवा सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन उभारण्‍याचे प्रमाण वाढत आहे. आपल्‍याला अपेक्षा नसलेली शहरे व ठिकाणांमध्‍ये देखील दररोज अधिकाधिक चार्जिंग स्‍टेशन्‍स उभारताना पाहायला मिळत आहेत. आजच्‍या युगातील कार खरेदीदारांसाठी ईव्‍ही (Electric Vehicle) योग्‍य पर्याय असण्‍यामागील कारण काय आहे? जागतिक सर्वेक्षणांमधून या इलेक्ट्रिफाइंग परिवर्तनासाठी विविध लक्षवेधक कारणे निदर्शनास येतात, जसे पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम, कमी मालकीहक्‍क खर्च, उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव आणि शांतमय राइडचा आनंद. आम्‍ही राज्‍यातील विविध ईव्‍ही मालकांना त्‍यांचे मत विचारले आणि अभिप्राय अत्‍यंत सकारात्‍मक होता.

अनेकांनी इलेक्ट्रिक वेईकलचा (Electric Vehicle) अवलंब करण्‍याप्रती त्‍यांच्‍या निर्णयामध्‍ये मित्र व ईव्‍ही समुदायांकडून करण्‍यात आलेल्या शिफारशी महत्त्वपूर्ण ठरल्‍याचे सांगितले. परदेशातील अनुभवांमधून प्रेरित असो किंवा पर्यावरणाप्रती जागरूक नागरिक बनण्‍याची इच्‍छा असो हे मालक आपल्‍या मतावर ठाम आहेत, ते म्‍हणजे एकदा इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब केल्यानंतर कधीच मागे वळून पाहणार नाही.

(हेही वाचा – बाळ माने आमच्या विचारधारे विरोधात; त्यांना BJP चा छुपा पाठिंबा हे ‘फेक नॅरेटिव्ह’; ॲड. बाबा परुळेकर यांनी केला खुलासा)

आरामदायी व शांतमय ड्राइव्‍ह
मुंबईतील बँकर नितीन कामत (Nitin Kamat) म्‍हणाले, ”ईव्‍ही ड्राइव्‍ह करण्‍याचा अनुभव उत्‍साहवर्धक आहे. यामधून अत्‍यंत शांतमय, आरामदायी प्रवासाचा आनंद मिळतो, तसेच मी शुद्ध हवेप्रती योगदान देत असल्‍याचे समाधान मिळते. सध्‍या हवेचा दर्जा खालावण्‍याचे संकट ओढावले असल्‍याने आपण सर्वांनी हरित भारत घडवण्‍याच्‍या दिशेने पाऊल उचलण्‍याची गरज आहे.”

किफायतशीर व सोईस्‍कर पुण्‍यातील कापड व्‍यवसायाचे मालक प्रभात कुमार यांच्‍यासाठी ईव्‍ही मालकीहक्‍काचे आर्थिक फायदे निर्विवाद आहेत. ते म्‍हणाले, ”मी इंधनासाठी होणाऱ्या खर्चासंदर्भात मोठ्या प्रमाणात बचत करतो, तसेच घरीच वेईकल चार्जिंग करण्‍याच्‍या सोयीसुविधेचा आनंद घेत आहे. माझ्यासाठी ही उत्‍साहवर्धक व समाधानकारक बाब आहे.” वीजेची किंमत जीवाश्‍म इंधनांच्‍या तुलनेत खूप कमी आहे, ज्‍यामुळे कार्यसंचालन खर्चांमध्‍ये मोठी घट झाली आहे. रूफटॉप सोलार इन्‍स्‍टॉल करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत असल्‍याने ईव्‍ही मालकांची मोठी बचत होत आहे. महाराष्‍ट्र वाढत्‍या सोलार क्षमतेसह देशामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, ज्‍याचे मोठे श्रेय पंतप्रधान सूर्या घर उपक्रमाला जाते, ज्‍यामुळे सरकारी अनुदानांच्‍या माध्‍यमातून सौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपलब्‍ध होण्‍याजोगी झाली आहे.

टाटा पॉवर व अदानी ग्रुप यांसारख्‍या खाजगी कंपन्‍या देखील राज्‍यभरात चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवत आहेत. टाटा पॉवर विविध ईव्‍ही चार्जिंग सोल्‍यूशन्‍स लाँच करत आहेत, ज्‍यामुळे बस किंवा होम सेटअपसाठी फास्‍ट चार्जरची गरज असल्‍यास ते सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची खात्री देत आहेत.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा मुंबईत सराव सुरू, ऑस्ट्रेलियात कधी जाणार याची अनिश्चितता कायम)

कमी देखभाल, रस्‍त्‍यावर अधिक ड्रायव्हिंगचा आनंद
ईव्‍हींसाठी देखभाल खर्च खूप कमी होतो, जो पारंपारिक वाहनांच्‍या तुलनेत जवळपास ५० टक्‍के कमी आहे. इंटर्नल कम्‍बशन इंजिन्‍समधील १,००० हून अधिक मूव्हिंग पार्टसच्‍या तुलनेत इलेक्ट्रिक वेईकल्‍समध्‍ये फक्‍त जवळपास २०० मूव्हिंग पार्टस् असल्‍यामुळे ऑइल बदलणे व उत्‍सर्जन तपासणीची गरज भासत नाही. रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग तंत्रज्ञान ब्रेक्‍समधील बिघाड कमी करते, ज्‍यामुळे वेईकल कमी दुरूस्‍तीच्‍या गरजेसह रस्‍त्‍यावर अधिक ड्रायव्हिंग आनंद देते.

शुद्ध भविष्‍य
नागरिक म्‍हणून आपली पर्यावरणाप्रती सकारात्‍मकपणे योगदान देण्‍याची जबाबदारी आहे. नागपूरमधील शालेय शिक्षिका निशी गोयल यांचे या बाबीला प्रबळ समर्थन आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, ”दरवर्षी आपल्‍या हवेचा दर्जा खालावत आहे. ईव्‍हीची निवड करत मी भावी पिढीसाठी शुद्ध पर्यावरण व आरोग्‍यदायी भविष्‍याप्रती माझे योगदान देत आहे.” बॅटरी तंत्रज्ञानामध्‍ये नुकतेच करण्‍यात आलेल्‍या सुधारणा ईव्‍हीला अधिक लक्षवेधक बनवत आहेत, तसेच अनेक मॉडेल्‍स एका चार्जमध्‍ये जवळपास ३०० किमीची रेंज देत आहेत. सुधारित ड्रायव्हिंग पायाभूत सुविधा, तसेच फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स अशा सेवांसह ड्रायव्‍हर्स जलदपणे ईव्‍ही रिचार्ज करू शकतात, ज्‍यामुळे ईव्‍ही शहरातील ड्रायव्हिंग आणि लांबच्‍या प्रवासासाठी व्‍यावहारिक पर्याय बनल्‍या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.