Elephanta Island : मुंबईहून एलीफंटा बेटावर जाता येतं का? कसं रे दादा?

31
Elephanta Island : मुंबईहून एलीफंटा बेटावर जाता येतं का? कसं रे दादा?
Elephanta Island : मुंबईहून एलीफंटा बेटावर जाता येतं का? कसं रे दादा?

एलीफंटा लेणी ही मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर एका बेटावर आहेत. या सुंदर आणि प्राचीन लेणी तुम्ही पाहायचा विचार करत असाल तर, तुम्हाला तिथपर्यंत कसं जाता येईल याचं सविस्तर वर्णन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात..

एलिफंटा लेणी पाहण्यासाठी सर्वांत आधी तुम्हाला मुंबईत यावं लागेल. मुंबईत आल्यानंतर चर्चगेट (Churchgate) किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरून गेटवे ऑफ इंडिया इथे या. गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) हे मुंबईतल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून एलिफंटा येथे घेऊन जाणाऱ्या फेरी असतात. (Elephanta Island)

(हेही वाचा – नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसात जाहीर करणार; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा)

तुम्ही मुंबईत कुठूनही येणार असाल तर चर्चगेट (Churchgate) किंवा सीएसएमटी (CSMT) स्थानाकापर्यंत जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडा. ही दोन्ही टर्मिनल स्थानकं आहेत. चर्चगेट किंवा सीएसएमटी पासून हेरिटेज लेनने गेटवे ऑफ इंडियाला (Gateway of India) चालत जाऊ शकता. चालत गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचण्यासाठी २० ते ३० मिनिटे एवढा कालावधी लागतो किंवा तुम्ही टॅक्सीनेही १० मिनिटांत तिथपर्यंत पोहोचू शकता. (Elephanta Island)

एलिफंटा हे बेट गेट वे ऑफ इंडियाच्या (Gateway of India) किनाऱ्यापासून सुमारे ११ किलोमीटर म्हणजेच ७ मैल एवढ्या अंतरावर आहे. तुमच्या प्रवासाच्या अर्ध्या अंतरावर तुम्हाला डावीकडे बुचर आयलंड म्हणून ओळखलं जाणारं एक लहान बेट दिसेल. त्यानंतर पुढे बोटीच्या दिशेने सरळ गेल्यावर एलिफंटा हे जंगलाने व्यापलेलं बेट दिसेल. (Elephanta Island)

(हेही वाचा – Matunga Robotics कार पार्किंगला विरोध; पण येथील अनधिकृत वाहनांवरील कारवाईकडेही दुर्लक्ष)

एलिफंटा येथे पोहोचल्यावर फेरी बोट तुम्हाला बेटाच्या उत्तरेकडच्या जेट्टीवर सोडेल. एलिफंटा गुहेचं मंदिर जेट्टीपासून चालत एक किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. जेट्टीपासून टेकडीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी एक लहान टॉय ट्रेन (Toy train) उपलब्ध आहे. त्याचं एकेरी भाडं ५ रुपये आहे. याव्यतिरिक्त तुम्ही घाटावरून चालत जाण्याचाही पर्याय निवडू शकता. तो रस्ता तुम्हाला घारापुरी गावच्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाईल. त्या ठिकाणी एक सिक्युरिटी गेट आहे. गावात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी ५ रुपये शुक्ल आकारण्यात येतं.

त्यानंतर पुढे तुम्हाला १२० पायऱ्या चढून लेण्या असलेल्या पठारावर जावं लागेल. हा ट्रेक मार्ग खचाखच भरलेल्या क्युरिओज, स्मृतिचिन्हे, मार्गदर्शक पुस्तके आणि टी-शर्ट विक्रीच्या स्टॉलमधून जातो. लेण्यांसाठी तिकीट काउंटर या मार्गाच्या शेवटी आहे. (Elephanta Island)

गुहेच्या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या न चढू शकणाऱ्या लोकांसाठी बेटावर पालखी सुविधा देखील आहे. एलिफंटा इथल्या मुख्य गुहेच्या अंगणात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तिकीट काउंटरवरील रांग ही शेवटची रांग असते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.