एल्फिन्स्टन कॉलेज (elphinstone college) ही मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८५६ मध्ये झाली आहे. हे डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, स्टेट क्लस्टर युनिव्हर्सिटीचे एक घटक महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय प्लॉट नंबर-१५६, एम. जी. गांधी रोड, मुंबई, मुंबई ४००००१ येथे स्थित आहे आणि ०२२ २२८४ ४०६० हा संपर्क क्रमांक आहे.
या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) द्वारे ‘A’ रेटिंग दिले गेले आहे. येथे विविध प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रोत्साहन दिले जाते. अंडरग्रेजुएट अभ्यासक्रमात बीए, बीएससी, बीकॉम आणि इतर विविध विषयांचा समावेश आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमात एमए, एमएससी, एमकॉम आणि इतर विशेष अभ्यासक्रम आहेत. त्याचबरोबर विविध विषय घेऊन पीएच. डी. करता येते. (elphinstone college)
(हेही वाचा – general post office mumbai : GPO Mumbai या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि काय आहे वैशिष्ट्य?)
इथे प्रवेश घेण्यासाठी योग्यतेचे मूल्यांकन केले जाते. अंडरग्रेजुएटसाठी पात्रता परीक्षेतील गुणवत्ता पाहिली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता आणि प्रवेश परीक्षा (लागू असल्यास) घेतली जाते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत महाराष्ट्रासाठी सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) प्रवेश दिला जातो. (elphinstone college)
या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. पुस्तके, जर्नल्स आणि ऑनलाइन संसाधनांच्या विशाल संग्रहाने सुसज्ज असलेली लायब्ररी आहे. विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाते. त्याचबरोबर विविध क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनही प्रफुल्लित राहते. तसेच प्लेसमेंट सेल, स्टुडेंट क्लब आणि समुपदेशन सेवा अशा सुविधाही पुरवल्या जातात. या महाविद्यालयाची इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व दिसून येते. गॉथिक वास्तुकलेच्या शैलीत बनवलेली ही वास्तू विद्यार्थ्यांना आकर्षित करते. या इमारतीला २००४ मध्ये UNESCO द्वारे संस्कृती वारसा संवर्धनासाठी आशिया-पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार प्रदान करण्यात आला. (elphinstone college)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community