एल्फिन्स्टन पॉईंट (Elphinstone Point) हे महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटामधलं महाबळेश्वर या हिल स्टेशनवर असलेल्या कित्येक नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे त्या काळचे गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या नावावर असलेलं हे ठिकाण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये १८३० साली डॉ. मरे यांनी शोधून काढलं.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेलं सुट्टी घालवण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. महाबळेश्वर इथलं थंडगार हवामान, सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगररांगांचं नैसर्गिक सौंदर्य आणि त्यांच्या आसपासच्या खोल दऱ्यांची विहंगम आणि स्पष्ट दिसणारे दृश्य यामुळे देशातलेच नाही तर परदेशातलेसुद्धा पर्यटकही इथे येण्यासाठी सतत आकर्षित होत असतात.
(हेही वाचा – Waqf Board : विधेयकाला काँग्रेसचा विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा)
पर्यटन विकास आणि त्यामध्ये वाढ
अगदी सुरुवातीला महाबळेश्वर येथे फक्त पायी किंवा घोड्यावरूनच जाता येत होतं. पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये रस्ते आणि तिथे राहण्याची सोय अशा मूलभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे एल्फिन्स्टन पॉइंटपर्यंत (Elphinstone Point) गाडीने प्रवास करता येतो. याव्यतिरिक्त इथे विकसित झालेले कित्येक रिसॉर्ट्स आणि इतर सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक अतिशय आरामदायी ठिकाण बनलं आहे. महाबळेश्वर येथे झालेला पर्यटन विकास हा तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरला आहे. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी, फूड सर्व्हिस सेवा आणि प्रवास यांसारख्या क्षेत्रामध्ये अनेक रोजगार निर्माण झाले आहेत.
महाबळेश्वर येथे असलेला एल्फिन्स्टन पॉइंट (Elphinstone Point) हा इथून दिसणाऱ्या प्रतापगड किल्ला आणि कोयना नदीच्या खोऱ्याच्या नयनरम्य दृश्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या पॉइंटवरून खळखळून वाहणारी नदी आणि आसपासच्या डोंगररांगांनी सजलेल्या हिरव्यागार निसर्गाचं अगदी जवळून दर्शन होतं. तसंच महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील इतिहासातला भाग असलेल्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येण्यास कायमच उत्सुक असतात.
(हेही वाचा – BEST Depots च्या जागांवर कुणाचा डोळा?)
नवीन पर्यटन ट्रेंड
अलीकडच्या काळात एल्फिन्स्टन पॉइंट (Elphinstone Point) यांसारख्या पर्यटन स्थळांवर ऍडव्हेंचर्स प्रवास आणि इको-टूरिझम हे जास्तीत जास्त लोकप्रिय होत चालले आहेत. हल्लीचे पर्यटक प्रेक्षणीय स्थळं नुसती पाहण्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा अनुभव घेण्याच्या शोधात असतात. जसं की, ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग आणि पक्षी निरीक्षण यांसारख्या कित्येक गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. या प्रदेशातलं नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता जतन करण्यावर लक्ष केंद्रित करून हा कल पर्यटनाच्या पुढे एक पाऊल टाकून पर्यावरणाच्या दृष्टीने इथला पर्यटन विकास एका जबाबदार स्वरूपाकडे वळलेला आहे.
ऍडव्हेंचर्स प्रवासाच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम इथल्या पर्यटन उद्योगावरही झाला आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये स्वतःला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यटन विकासाच्या या बदलामुळे होमस्टे आणि कृषी सहलींचा विकास झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना पश्चिम घाटातल्या जीवनाचा खरा अनुभव कसा असतो ते जवळून पाहायला मिळतं. हल्लीच्या वाढत्या टेक्नॉलॉजीमुळेही पर्यटन विकासावर मोठा परिणाम झाला आहे. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या कित्येक ऑप्शन्समुळे इथे येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पर्यटकांना महाबळेश्वर इथला एल्फिन्स्टन पॉइंट (Elphinstone Point) आणि इतर पर्यटनस्थळं शोधणं सोपं झालं आहे.
(हेही वाचा – MPSC परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; आंदोलक विद्यार्थ्यांना दिलासा)
तसंच ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म आणि ट्रॅव्हल ब्लॉग्सच्या मदतीने सहलीचं नियोजन करणं जास्त सोयीस्कर झालं आहे. निसर्गप्रेमी पर्यटक आणि प्रवासामध्ये ऍडव्हेंचर शोधणाऱ्या पर्यटकांसाठी ही ठिकाणं सोशल मीडिया साईटवर सहज उपलब्ध होतात. एल्फिन्स्टन पॉइंट (Elphinstone Point) टुरिझम आपलं ऐतिहासिक आकर्षण आणि नैसर्गिक सौंदर्य कायम राखत आले आहेत. महाराष्ट्रातलं हे एक प्रमुख पर्यटन स्थळ राहण्यासाठी आणि सातत्याने बदलणाऱ्या ट्रेंडशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाश्वत पर्यटन पद्धती आणि पर्यटकांच्या नवीन मागण्या स्वीकारल्याने एल्फिन्स्टन पॉइंट हा भारताच्या पर्यटन नकाशावर आपलं स्थान कायम टिकवून ठेवेल यात शंका नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community