पेशवे राजवटीच्या काळामध्ये पुण्यात काही अतिशय सुंदर बांधकाम केले गेले. तसंच उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र असलेल्या काही आकर्षक वास्तू मुंबई सारख्याच पुण्यातही पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच तुम्हाला हिरव्यागार निसर्गाचं आकर्षण असेल तर, पुण्यात असणाऱ्या मोहक पर्वतरांगा तुमचं मन वेधून घेतील. याव्यतिरिक्त पुण्यात असलेलं एक हिरवंगार बोटॅनिकल गार्डन हे तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेईल.
पुण्यातलं एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे १८२ वर्षं जुनं गार्डन आहे. या गार्डनमध्ये सर्वांत सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह आहे. इथे असलेच्या वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती तुमच्या मनाला आनंद देतील. या गार्डनची ताजी हवा आणि शांत सौंदर्य तुम्हाला एक रिफ्रेशिंग अनुभव देतं. (Empress Botanical Garden)
(हेही वाचा – मायावतींच्या पुतळ्यांविरुद्धची याचिका निकाली; निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा Supreme Court चा सर्व पक्षांना आदेश)
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे पुण्यातलं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे गार्डन तुम्हाला नक्कीच एक वेगळा आनंददायी अनुभव देईल. इथली भव्य उंच झाडं आणि त्यांचा पर्णसंभार तुम्हाला झाडांच्या इतिहासाबद्दल, ती झाडं एका शतकाहून अधिक काळ कशी वाढली आणि टिकून राहिली याबद्दल विचार करायला लावतो. शहरातल्या काँक्रीटच्या जंगलापासून आणि कॅफेमधून काही काळ विश्रांती घ्या आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनला भेट द्या.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे ३९ एकर एवढ्या क्षेत्रात पसरलेलं आहे. ब्रिटिशांच्या काळात राणी व्हिक्टोरिया यांनी या गार्डनला भेट दिली होती. एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनला सोल्जर्स गार्डन म्हणूनही ओळखलं जातं. कारण त्या काळी ब्रिटिश अधिकारी आपला निवांत वेळ या गार्डनमध्ये घालवत असत. (Empress Botanical Garden)
(हेही वाचा – Dagdusheth Halwai Ganpati Temple मध्ये कोणकोणते सामाजिक उपक्रम होतात?)
या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोमांचक फुलांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती आहेत. इथे असलेल्या काही दुर्मिळ प्रजाती सुमारे १०० वर्षे जुन्या आहेत. झुडुपे, झाडे, वनस्पती एक्सप्लोर करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या ठिकाणाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी संध्याकाळी या बागेभोवती फेरफटका मारणं हा एक आल्हाददायक अनुभव असेल.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या पाम विभागात सुमारे १५० प्रजातींची झाडं आणि फुलं आहेत. त्यांपैकी १२५ दुर्मिळ आणि स्थानिक प्रजाती आहेत. एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये उष्णकटिबंधीय झाडांसाठी एक विभाग आहे. तसंच मुलांचं मनोरंजन करण्यासाठी एक लहान प्राणीसंग्रहालय आहे. (Empress Botanical Garden)
(हेही वाचा – ‘एनएसएस, एनसीसी कॅडेट्सनी ‘या’ सवयी लावाव्यात’; PM Narendra Modi यांनी परेडमध्ये सहभागी स्वयंसेवकांशी साधला संवाद)
या गार्डनमध्ये एक विस्तीर्ण हिरवंगार मैदान आहे. या मैदानात फुटबॉल आणि क्रिकेट सारख्या मैदानी खेळांचा आनंद घेता येतो. तसंच योग आणि मेडिटेशनचा सराव करण्यासाठी आणि काही वेळ शांततेत घालवण्यासाठी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे एक आदर्श ठिकाण आहे. इथे असलेलं सुंदर कमळाचं तळं या गार्डनच्या आकर्षणात भर घालतं. प्रेमीयुगुलांना एकांतात वेळ घालवता यावा यासाठी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे सचिव सुरेश पिंगळे यांनी या गार्डनमधल्या एका विभागाला एक ब्रीदवाक्य दिलं आहे. “Love birds don’t worry, come and sit on our branches”
(हेही वाचा – republic day 2025 : प्रजासत्ताक दिनाला शुभेच्छा द्यायच्यात ना? मग वाचा republic day चे सर्वोत्तम quotes!)
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन इथले प्रदर्शन
“बड्स अँड ब्लूम” हा पुण्यातल्या एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये दरवर्षी एक अनोखा फ्लॉवर शो असतो. या ठिकाणी तुम्ही फुलं आणि इतर रोपांच्या भव्य प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकता.
या प्रदर्शनात लता, जमिनीवरचे वनस्पती आणि बोन्साय वृक्षांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या झाडांच्या प्रजातींच्या रोपांवर त्यांचं स्थानिक आणि वैज्ञानिक नाव लिहिलेलं असतं. तसंच त्या-त्या वनस्पतीचं सामान्य वर्णन असलेले फलक असतात. जसं की, ते वनस्पती कुठे लावता येतात आणि ते कोणत्या प्रकारच्या हवामानात वाढू शकतात इत्यादी. (Empress Botanical Garden)
जर तुम्हाला बागकामाची आवड असेल तर, हे प्रदर्शन म्हणजे तुमच्या वेळेची मोठी गुंतवणूक असेल. इथे तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकता येईल. या प्रदर्शनात तुम्ही, तुम्हाला आवडलेल्या रोपांची खरेदीही करू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community