EPFO KYC : ईपीएफओसाठीची केवायसी ऑनलाईन कशी करायची?

EPFO KYC : ई सेवा पोर्टलमुळे केवायसी ऑनलाईन करणं शक्य झालं आहे.

44
EPFO Rule Change : आता पीएफचे पैसे रद्द झालेल्या चेक शिवाय मिळणार
  • ऋजुता लुकतुके

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात, ईपीएफओनं अलीकडे काही स्वागतार्ह तांत्रिक बदल केले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. त्यासाठी ईपीएफओ कार्यालयाने ई सेवा पोर्टल सुरू केलं आहे. आणि त्यातून खातेदाराची माहिती अपडेट करणं तसंच केवायसी अपडेट करणं ही महत्त्वाची कामं आता ऑनलाईन होऊ शकणार आहेत. त्यासाठी कार्यालयाच्या खेपा घालणं आता गरजेचं नाही. (EPFO KYC)

ऑनलाईन सेवांसाठी ईपीएफओनं तयार केलेल्या सेवेला जॉइंट डिक्लेरेशन असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच खातेदार आणि ते काम करत असलेली कंपनी यांनी एकत्रपणे दिलेली मान्यता. एकदा ती मिळाल्यावर खातेदार आपल्या खात्यांमधील काही बदल हे ऑनलाईन पद्धतीने इतर फारशा परवानग्या न घेता करू शकणार आहेत. यातच केवायसी अपडेट करणं ही सेवाही आली. केवायसी अपडेट आता तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन करू शकणार आहात. (EPFO KYC)

(हेही वाचा – ‘मराठी भाषेचा अवमान केलात तर कानाखाली बसेल’; Raj Thackeray यांचा इशारा)

यापूर्वी काही वेळा ईपीएफओनं खातेदारांची पैसे काढून घेण्यासाठी केलेले अर्ज माहिती जुळत नसल्याच्या कारणावरून अमान्य केले आहेत. पॅन, आधार, नोकरीच्या ठिकाणी दिलेली माहिती यामध्ये काही फरक आढळल्यास ईपीएफओ कार्यालय तुमचा पैशाचा क्लेम अमान्य करतं. अशावेळी तुमच्याकडे आवश्यक बदल करून घेण्यासाठी कार्यालयाचे खेटे घालणं हा एकच पर्याय उरतो. पण, आता ही प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे. (EPFO KYC)

ईपीएफओ कार्यालयाने ११ प्रकारची वैयक्तिक माहिती तसंच ६ सेवांमध्ये बदल करण्याची परवानगी खातेदारांना दिली आहे. ईपीएफओ च्या ई सेवा पोर्टलवर गेल्यावर तुमचा युएएन क्रमांक वापरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्डाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल. तो तिथे टाकावा लागेल. (EPFO KYC)

(हेही वाचा – Assembly Budget Session 2025 : शक्तीहीन विरोधकांचे सक्तीचे सहकार्य)

  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही जॉइंट डिक्लेरेशन टॅबवर क्लिक करायचं आहे.
  • यात गेल्यावर ‘मॅनेज’ टॅब क्लिक करून त्यात अपडेट डिटेल्स हा भाग निवडायचा आहे.
  • तुमची वैयक्तिक माहिती तपासून पाहण्यासाठी आधार कार्डावरील माहितीचा ॲक्सेस मिळावा यासाठी ते विनंती करतील, ती तुम्हाला मान्य करावी लागेल.
  • त्यानंतर जे बदल करायचे आहेत ते करून त्याप्रमाणे कागदपत्रांची प्रत तुम्हाला अटॅच करावी लागेल.

तुम्ही एकदा बदलासाठी हा अर्ज दाखल केल्यानंतर तुमची कंपनी आणि ईपीएफओ कार्यालय असे दोघेही त्याला मान्यता देतात. त्यानंतर ही माहिती तुमच्या नावासमोर अपडेट होते. या प्रक्रियेला २० ते २५ दिवस लागतात. त्याहून जास्त वेळ लागल्यास तुम्ही कंपनीत प्रशासकीय विभागाकडे चौकशी करू शकता. कारण, तुमची माहिती त्यांना पडताळून पाहायची असते. आणि त्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनेच ईपीएफओ सेवा पोर्टलवर कळवायचं असतं. ते त्यांनी केलं नसेल तर तुम्हाला कंपनीला कळवावं लागेल. (EPFO KYC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.