EV Scooter Prices : इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती खाली येण्याची शक्यता

EV Scooter Prices : वाढती स्पर्धा आणि खप वाढावा यासाठी कंपन्यांनी दर कमी करण्याचं धोरण ठेवलं आहे 

398
EV Scooter Prices : इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती खाली येण्याची शक्यता
EV Scooter Prices : इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती खाली येण्याची शक्यता

ऋजुता लुकतुके

इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य आहे यावर जाणकार आणि ग्राहकही ठाम आहेत. (EV Scooter Prices) पण, अजूनही पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमती आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती यात किमतींतली तफावत ६० टक्क्यांची आहे. पूर्वी तर ती ८० टक्के इतकी होती. पण, आता भारतीय बाजारपेठेत चित्र हळू हळू बदलणार आहे. वाढती स्पर्धा आणि खप वाढावा यासाठी अनेक दुचाकी कंपन्यांनी किमती कमी करण्याचं धोरण ठेवलं आहे. सुरुवातीला सवलतीच्या माध्यमातून हा फायदा ग्राहकांना देण्यात येत आहे. (EV Scooter Prices)

(हेही वाचा- 5G For Corporates : विप्रो आणि नोकियाची कंपन्यांसाठी ५जी सेवा  )

ओला इलेक्ट्रिक, इथर एनर्जी, ओकाया इव्ही, चेतक टेक्नोलॉजी या भारतातील मुख्य कंपन्यांनी दर कमी करण्याला सुरुवातही केली आहे. यात ओला इलेक्ट्रिक आघाडीवर आहे. त्यांच्या ई-स्कूटरवर ((EV Scooter Prices)) २५,००० रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. तर एथर एनर्जी कंपनीनेही (Aether Energy Company) आपल्या ४५०एस मॉडेलच्या किमती २०,००० रुपयांनी कमी केल्या आहेत. (EV Scooter Prices)

(हेही वाचा- Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? )

जानेवारी महिन्याची आकडेवारी बघितली तर गेल्यावर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची ((EV Scooter Prices)) विक्री २० टक्क्यांनी वाढली आहे. पण, एकूण दुचाकी विक्रीचा आढावा घेतला तर त्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीची हिस्सेदारी फक्त ४.५ टक्के इतकीच आहे. त्यामुळे कंपन्यांनी किमती कमी करण्याचं धोरण ठेवलं आहे. (EV Scooter Prices)

इलेक्ट्रिक वाहन (EV Scooter Prices) क्षेत्र हे विकसनशील आहे. आणि एका चार्जमध्ये नेमकी सरासरी किती मिळेल याची ग्राहकांना खात्री न वाटणं, चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसणं आणि पेट्रोल, डिझेल इंजिनाच्या तुलनेत कंपनीला पडणारा अतिरिक्त उत्पादन खर्च यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची ((EV Scooter Prices)) किंमत इतर वाहनांच्या तुलनेत जास्त आहे. पण, आता या कंपन्यावर त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. (EV Scooter Prices)

इलेक्ट्रिक वाहनं (EV Scooter Prices) आणि स्कूटरना लागणारी बॅटरी स्वस्त आणि नियमितपणे उपलब्ध झाली तर किमती आणखी कमी होऊ शकतील. शिवाय चार्जिंगची सोय जागोजागी असावी याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत इ-स्कूटरच्या (EV Scooter Prices) किमती आणखी कमी होऊ शकतील. (EV Scooter Prices)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.