Blood Pressure : सतत फोनवर बोलता? जरा दमानं! होईल रक्तदाबाचा त्रास

अनेक माणसांच्या दिवसाची सुरूवात ही मोबाईल पाहाण्याने, मोबाईलवर बोलण्यानेच होते. ज्याप्रमाणे आपण कालांतराने वजन तपासतो, संपूर्ण शरीराची तपासणी करतो त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आवर्जून मोजायला हवी.

247
सतत फोनवर बोलणे रक्तदाब वाढवेल
सतत फोनवर बोलणे रक्तदाब वाढवेल

सध्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांच्या इतकेच महत्त्व फोनचे आहे. कार्यालयीन कामांसाठी, संवादासाठी मोबाईलची गरज आहे. त्याच्याशिवाय जगणे आजच्या काळात जवळपास अशक्य आहे. मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आपल्या समोर सतत येत असतात. काही काळापूर्वी झालेल्या एका संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाबाशी Blood Pressure संबंधित समस्या निर्माण होतात असे समोर आले आहे.

अनेक माणसांच्या दिवसाची सुरूवात ही मोबाईल पाहाण्याने, मोबाईलवर बोलण्यानेच होते. ज्याप्रमाणे आपण कालांतराने वजन तपासतो, संपूर्ण शरीराची तपासणी करतो त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आवर्जून मोजायला हवी. आठवड्याला किती मिनिटे मोबईलवरून संभाषण होते याची मोजणी करायला हवी. प्रत्येक आठवड्याला जर ३० मिनिटांहून अधिक वेळ फोनवर बोलणे होत असेल तर उच्च रक्त दाबाशी Blood Pressure संबंधित विकार नकळत जडू शकतात.

(हेही वाचा Barsu Refinery :  महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला )

जी व्यक्ती ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ फोनवर बोलते त्याच्या तुलनेत जी व्यक्ती प्रत्येक आठवड्यला ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलते तिच्यात उच्च रक्तदाब Blood Pressure विकसित होण्याचा धोका १२ टक्क्यांनी वाढतो. ३५ ते ७३ वयोगटातील एकूण २,१२,०४६ प्रौढांचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास एक – दोन नाही तर सलग १२ वर्षांसाठी करण्यात आला होता. संशोधनाच्या अंती एक निष्कर्ष समोर आला. त्यानुसार फोनवर ३० मिनिटांहून अधिक वेळ बोलणाऱ्या १३९,८४ लोकांमध्ये उच्च रक्त दाबाची लक्षणे दिसली. दुसरा गट इतका वेळ फोनवर बोलत नव्हता. त्यांच्यामध्ये अशी लक्षणे दिसून आली नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.