अलिकडे फोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यामुळे अनेक लोक नव्या फोनची खरेदी करताना खूप रिचर्स करू लागले आहेत. अलिकडे स्मार्टफोन ब्लास्ट होणे, जास्त हिट होऊन स्मार्टफोन फुटणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक युजर्स जखमी झाले आहेत. त्यामुळे असा स्फोट रोखता येऊ शकतो का? स्मार्टफोन ब्लास्ट होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल, याविषयी आपण जाणून घेऊया.
( हेही वाचा : मास्टर ब्लास्टर सचिनच्या ‘बेस्ट’ बस सोबतच्या ‘बेस्ट’ आठवणी! )
स्मार्टफोन ब्लास्ट होऊ नये म्हणून अशाप्रकारे काळजी घ्या…
- स्मार्ट फोन आपटला किंवा पडल्यावर तेव्हा त्याची बॅटरी हलते. यामुळे शॉर्ट सर्किट आणि ओव्हरहिटींग होऊ शकते. त्यामुळे बॅटरीवर अतिरिक्त दबाव पडणार नाही याची काळजी घ्या.
- रात्रभर फोन चार्जिंग केल्यामुळे सकाळी फुल्ल चार्जिंग मिळते पण यामुळे तुमच्या फोनची बॅटरी डॅमेज होण्याची शक्यता असते.
- मल्टी टास्किंग करताना फोनवर अतिरिक्त ताण देऊ नका. फोन तेव्हाच गरम होतो जेव्हा प्रोसेसरवर मल्टी टास्किंग आणि मोठ्या गेम्सचा भार येतो. यामुळे जास्त हिट होऊन स्मार्टफोन फुटण्याची शक्यता असते.
- स्वस्त मिळतोय म्हणून डुप्लिकेट चार्जर ( Duplicate charger) वापरू नका. तसेच शक्यतो मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरा अन्यथा बॅटरी खराब होते.
- जास्त उष्णतेमुळे फोनची बॅटरी खराब करू शकते. सतत उन्हात स्मार्टफोन वापरल्यामुळे बॅटरीवर परिणाम होतो तसेच पाण्यापासून सुद्धा स्मार्टफोन दूर ठेवा.