#गुढीपाडवा : राज्यभरात उत्साहाचे वातावरण

161

संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मिरवणूक, शोभायात्रा, बाइक रॅली काढण्यात आल्या. तब्बल २ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने कोविडचे सर्व नियम रद्द केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व )

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह

यंदा गिरगावात शिवसेनेतर्फे आरोग्यगुढी उभारण्यात आली आहे. सर्वप्रथम गुढीचं पारंपारिक पूजन करण्यात आले. त्यानंतर भव्य शोभायात्रा निघणार निघाली. या शोभायात्रेत मुंबईकरांचे स्पीरीट दाखवणारे भव्य चित्ररथ दाखवण्यात आले. मुंबईकरांचे कुलदैवत मुंबादेवीची प्रतिकृती तसेच मुंबई महापालिका इमारतीची प्रतिकृती यंदाचे आकर्षण ठरले.

पुण्यात सुद्धा कोथरूड परिसरात हिंदू जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शोभयात्रा काढण्यात आली यावेळी पारंपरिक वेशभूषा करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर लहान मुलांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके देखील सादर केले आहेत. या शोभायात्रांमधून आपल्या पारंपारिक संस्कृतीचे दर्शन होताना दिसते.

यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होणार असल्याने, डोंबिवली येथे संस्कारभारतीच्या रांगोळीची थिम स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष अशी होती.  डोंबिवली पश्चिम महावैष्णव मारुती मंदिरात सकाळी साडेसहा वाजता पूजा करून कोविड योद्ध्यांचा सत्कार केला गेला. त्यानंतर नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.