पारंपारिक दिवाळीचे स्वरुप पूर्णपणे आधुनिक होऊन, दिवाळीची रुपरेषा कालागणिक बदलत जात आहे. दिवाळीच्या सणाला अलिकडे फॅशनची नवी जोड प्राप्त होत, ऑनलाईन खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याआधी दिवाळीत बाजारपेठा खरेदीच्या केंद्रस्थानी होत्या.
परंतु ग्राहकांची वाढती मागणी, कोरोना काळातील निर्बंध, डिजीटल युग याला अनुसरुन खरेदीच्या ऑनलाईन माध्यमांना अधिक पसंती मिळत आहे. स्मार्ट फोनवरुन घरबसल्या खरेदी करणे अधिक सोयीस्कर असल्याने, ऐन दिवाळीत ऑनलाईन खरेदीला बहर आला आहे. त्यामुळेच ऑनलाईन बाजारपेठांकडून ग्राहकांसाठी काही खास सवलतीसुद्धा देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना भुरळ
पणत्या, रांगोळी, फराळ, कपडे दिवाळीच्या प्रत्येक वस्तूंची विक्री करण्यात डिजीटल कंपन्या अग्रेसर आहेत. या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती पुरवतात. यामुळे भर गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा, सवलीच्या दरात आकर्षक खरेदी करण्यावर अधिक भर दिला जातो.
साद …सवलतीच्या खरेदीला
अॅमेझॉन, अजिओ, मिंत्रा, फ्लिपकार्ट, मिशो या डिजीटल कंपन्या बिग दिवाली सेल, दिवाळी धमाका या अंतर्गत ग्राहकांना जवळपास ३० ते ४० टक्के अशी भारी सवलत देतात. यामुळे ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा असलेला कल हा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच डिजीटल कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन जास्तीत जास्त सवलत देण्यासाठी चढाओढ होत असते.
अशा आहेत सवलती
मिशो (Meesho) – महा इंडियन दिवाली सेल- ७०% सूट
अॅमेझॉन (Amazon) – ग्रेट इंडियन फेस्टिव्हल- महिलांच्या कपड्यांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट
अजिओ (Ajio) – डॅझलिंग दिवाली सेल- ५० ते ९० % सूट
मिंत्रा (Myntra) – दिवाली सेल- ५० ते ८० % सूट
फ्लिपकार्ट (Flipkart) – बिग दिवाली सेल