शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय इतिहास संशोधन परिषदेने संसद ग्रंथालयात आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावरील प्रदर्शनाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच लोकसभेचे व राज्यसभेचे सदस्य या वेळी उपस्थित होते.
( हेही वाचा : आता बारा रुपयांत पोहोचा नेपाळला! )
अज्ञात नायकांच्या स्मृती राष्ट्रीय स्मृतीत कोरल्या जाव्यात
हे प्रदर्शन म्हणजे भारताच्या इतिहासातील 1757 ते 1947 या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडाची झलक आहे, असे प्रधान यांनी यावेळी सांगितले. अज्ञात नायकांच्या स्मृती राष्ट्रीय स्मृतीत कोरल्या जाव्यात हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचेही प्रधान यानी नमूद केले. देशाच्या विविध भागातील खासदारांनी प्रदर्शनाला भेट देऊन आपापल्या भागातील असे अज्ञात नायक सुचवावेत असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे विविध राज्यांच्या समन्वयाने हे प्रदर्शन देशात शंभर ठिकाणी भरवण्यात येईल तसेच डिजिटल मंचावरही आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community