स्थूलता सध्या सर्वसाधारपणे पाहिला जाणार आजार आहे. मुळात स्थूलता हा आजार आहे, याबाबत लोक आजही संमभ्रमात आहेत. पण, स्थूलतेमुळे अनेक आजार उद्भवतात. तसेच स्थूल शरीर आजारांशी लढण्यासाठी सक्षम नसते. मधूमेह असणा-या स्थूल व्यक्तींची रोगप्रतिकारक्षमता फार कमी असते. विसाव्या शतकातील पिढी, तसेच लहान मुलांमध्ये दिसून येणारी स्थूलता ही अनुवांशिक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. १८ ते ४५ वयोगटात स्थूलता लक्षणीय प्रमाणात वाढत असतानाच आता लहान वयाच्या मुलांमध्येही कोविडकाळात वाढत असलेली स्थूलता वेळीच आवरा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
स्थूलतेचे ‘हे’ आहे कारण
अनुवांशिकतेने आता रोगप्रतिकारकशक्ती फार कमजोर मिळते. त्यामुळे शरीरातील वजन लवकर कमीच होत नाही. सध्याच्या युवा पिढीतील कमजोर झालेली रोगप्रतिकारकशक्ती अगोदरच शरीरात आली आहे, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे बॅरिएट्रीक सर्जन डॉक्टर शशांक शाह यांनी दिली आहे. या कमजोर रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी कितीही औषधोपचार केले तरीही वजन नियंत्रित राहत नाही, असही डॉक्टर शाह पुढे म्हणाले.
‘या’ गोष्टींवर द्या भर
सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर पारस कोठारी यांच्यामते, कोव्हिड काळात मुलांचे अनपेक्षित वजन वाढत आहे. मुलांचे वजन वाढण्याबाबत मुळात पालकच सजग नाहीत. त्यामुळे वाढलेले वजन आपल्या मुलासाठी चांगले असल्याच समजून, पालक आपल्या मुलाला निरोगी समजतात. कोविडनंतर ५ ते १५ वयोगटात स्थूलपणा अधिक दिसून आल्याचं शहा म्हणाले. मात्र लहानमुलांमधील स्थूलता वेळेवर नियंत्रणात येते. त्यासाठी बॅरिएट्रीक सर्जरीचा पर्याय डॉक्टर कोठारी नाकारतात. वेळेवरच मुलांच्या खाण्याकडे, शारिरीक व्यायामाकडे पालकांनी लक्ष द्यावे. शक्यतो आहारतज्ज्ञांचा सल्ला घेत वजन नियंत्रित आणायला हवे, असेही डॉक्टर कोठारी म्हणाले.
(हेही वाचा :आजारपणाला महागाईची झळ, औषधांमध्ये २० टक्क्यांची दरवाढ)
लहान मुलांमधील स्थूलतेबाबतची कारणे
- वाढते जंकफूड
- ऑनलाईन क्लासेसमुळे वाढती बैठी जीवनशैली
- शरीराची मंदावलेली हालचाल