ऑलिव्ह रिडलेला सेटलाईट टॅगिंग करताच ‘ही’ मोठी माहिती आली हाती….

124

राज्यात विणीच्या हंगामात किनारपट्टीवर अंडी घालणा-या ऑलिव्ह रिडले कासवाच्या सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्याच्या प्रयोगात वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यात सॅटलाईट केलेल्या ‘सावनी’ असे नामकरण झालेल्या मादी कासवाने महिन्याभरातच दोनदा समुद्रकिना-यावर अंडी घातली आहेत. भारताच्या पश्चिम किना-यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या काळाबाबत असलेली उत्सुकता ‘सावनी’मुळे पहिल्यांदाच उलगडली आहे.

जानेवारीपासून सुरु होणा-या विणीच्या हंगामात एक मादी ऑलिव्ह रिडले कासव दोन ते तीन वेळा किनारपट्टीवर येऊन अंडी घालते. नेमक्या कितीकाळानंतर मादी ऑलिव्ह रिडले कासव पुन्हा येते, पहिल्यांदा अंडी घातलेल्या ठिकाणीच मादी कासव पुन्हा येते का, याबाबत कोणतीच मुबलक माहिती पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांबाबत नव्हती. राज्यातील ऑलिव्ह रिडले कासवांबाबतही ही उस्तुकता होती.

( हेही वाचा : महापालिका रुग्णालयांमध्ये आयुर्वेदाला महत्व किती? जाणून घ्या )

आता ‘सावनी’मुळे खालील गोष्टी निदर्शनास आल्या आहेत

  • २५ जानेवारी रोजी पहिल्यांदा अंजर्ले किनारपट्टीवर ‘सावनी’ला सॅटलाईट टॅगिंग केले गेले. यावेळी तिने ८७ अंडी घातली होती. बरोबर महिन्याभरानंतर आज शुक्रवारी सकाळी तिने नजीकच्या केळशी भागांत ७६ अंडी घातली.
  • सावनी – २५ जानेवारीनंतर सावनीने आता अंडी घालण्याचे प्रमाण कमी केले आहे. कदाचित अंडी घालण्याची पहिली फेरी २५ जानेवारी अगोदरही एकदा झाली असावी. आतापर्यंत सावनीकडून तीन अंडी घालण्याच्या फे-या पूर्ण झाल्या असाव्यात, असा अंदाज कांदळवन फाऊंडेशनचे सागरी जीवशास्रज्ञ हर्षल कर्वे यांनी व्यक्त केला. सावनीला आंजर्लेला महिन्याभरापूर्वी सॅटलाईट टॅगिंग केल्यानंतर ती जवळच्या भागांतच फिरत आहे.
  • प्रथमा – सावनीच्या अगोदर एक दिवसअगोदर ‘प्रथमा’ या मादी कासवाला सर्वात पहिल्यांदा सॅटलाईट टॅगिंग करण्यात आले आहे. प्रथमा रत्नागिरीपासून रायगडच्या अर्ध्या किनारपट्टीपर्यंत फिरून पुन्हा रत्नागिरीत परतली आहे. दिवेआगार, श्रीवर्धन ते आता गुहागर ते दाभोळ किनारपट्टीतील समुद्रात प्रथमाचा स्वैर संचार सुरु आहे.
  • ‘वनश्री’ या मादी ऑलिव्ह रिडले कासवाला दोन आठवड्यांभरापूर्वी सॅटलाईट टॅगिंग केले गेले. वनश्रीला गुहागर किनारपट्टीवर सॅटलाईट टॅगिंग केले गेले. ती गुहागर किनारपट्टीतील समुद्रातच फिरत आहे. दुस-या दिवशी लक्ष्मी आणि रेवा या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग केले गेले. त्यापैकी ‘लक्ष्मी’ गुहागर ते गणपतीपुळेदरम्याम समुद्रात फिरत आहे. तर ‘रेवा’ गुहागर किनारपट्टीतील समुद्रातच फिरत आहे.

टॅगिंगमुळे माहिती मिळण्यास मदत 

सावनीच्या हालचालींवरुन राज्यातील किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणा-या मादी कासव जवळच्या ठिकाणीच अंडी घालण्यासाठी पुन्हा येत असल्याचे दिसून आले. ऑलिव्ह रिडले कासव पुन्हा तेच ठिकाण निवडत नसून, याआधी ऑलिव्ह रिडले कासव १५ दिवसांच्या अवधीनंतर मादी कासव अंडी घालण्यासाठी येतात, असा अंदाज होता. परंतु राज्यात मादी कासवांचा अंडी घालण्याच्या दोन ते तीन फे-या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत त्या जवळच्या समुद्रातच फिरत असल्याचे आतापर्यंतच्या सॅटलाईट टॅगिंगच्या निदर्शनात दिसून आले आहे असे वनविभाग, कांदळवन फाऊंडेशनचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.