सावधान! तु्म्ही रात्री LED च्या संपर्कात तर राहत नाहीत ना?

घरातील वापरामुळे ते विद्युत रोषणाई आणि इतर अनेक ठिकाणी एलईडी लाइटचा वापर वाढला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी एलईडी लाइट्सच्या संपर्कात आल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

चीनमधील शांघाय जिओटाॅन्ग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना मधुमेहाचा वाढता धोका आणि रात्रीची लाइट यांच्यातील परस्परसंबंध आढळला आहे. त्यांना असे आढळले की, रात्रीच्या प्रकाशाच्या तीव्र संपर्कामुळे मेलाटोनिन आणि काॅर्टिकोस्टेराॅन सारख्या हार्मोन्साच्या प्रोफाइलमध्ये बदल होऊ शकतो.

असा उडतो शरीराचा गोंधळ

  • जेव्हा अंधार पडू लागतो, तेव्हा आपले मेलाटोनिनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे आपल्याला झोप येते. तुमची साखरेची पातळी तुमच्या जागृत होण्याच्या संप्रेरकांसोबत वाढते.
  • तेजस्वी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी शरीरात मेलाटोनिन सोडायचे की दाबायचे याबद्दल गोंधळ होतो, असे डाॅक्टर मोहन यांनी सांगितले.
  • मेलाटोनिनला दडपून टाकल्यामुळे शरीर जागृत आणि सतर्कतेच्या स्थितीत राहते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होते आणि काऊंटर रेग्युलेटरी हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे शरीरावर ताण येतो.

( हेही वाचा: आजोबांना नकोशी वाटणारी बिमारी; नातवाला वाटते हवीहवीशी )

या कर्मचा-यांना धोका जास्त

  • रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणा-यांना लाइटमध्ये काम करावे लागते. हा गट जीवनशैलीबाबत कमी शिस्तबद्ध असतो. त्यांना कमी झोप मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग आणि लठ्ठपणा यांचा त्रास होऊ शकतो.
  • मधुमेह आणि जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे.
  • उशिरा झोपणा-यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here