एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरताय, मग ‘ही’ बातमी वाचाच…

सध्या तरुणाईमध्ये एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. जास्त सिम कार्डचा वापर करुन गुन्हे केले जातात. त्यामुळे आता दूरसंचार विभागाने एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दूरसंचार विभागाच्या नव्या नियमानुसार, 9 पेक्षा जास्त सिम कार्ड ठेवणा-या यूजरला त्या सिम कार्डची पडताळणी करावी लागणार आहे आणि पडताळणी न केल्यास सिम कार्ड बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा नियम 7 डिसेंबर 2021 पासून देशात लागू करण्यात आला आहे.

३० दिवसांत सिम बंद करण्याचा आदेश

दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला आदेश दिला आहे की, ज्या यूजर्सकडे ९ पेक्षा जास्त सिम कार्ड आहेत. त्यांना नोटिफिकेशन पाठवले जाईल. सर्व सिम कार्डचे आउटगोइंग कॉल ३० दिवसांत बंद केले जाणार. तर इनकमिंग कॉल ४५ दिवसांच्या आत बंद करण्याचा आदेश दिला आहे. मोबाइल सिम यूजर्सकडे असणारे एक्स्ट्रा सिम सरेंडर करण्याचा ऑप्शनसुद्धा देण्यात आला आहे.

धोके टळण्यास मदत

आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. अशा घटनांपासूनचे धोके टळण्यास मदत होणार आहे.

दूरसंचार कंपन्यांनी करावी कारवाई

दूरसंचार कंपन्यांनी वापरात नसलेल्या सिमबाबत कारवाई करावी, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमानुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

 ( हेही वाचा:  आता संजय राऊतांकडून भाजपाला शिवीगाळ! ) 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here