Eye Care Tips: लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण पडतोय? ‘हे’ आत्ताच करा

272

आजकाल दिवसाची सुरुवात आणि शेवट स्क्रीनच्या दर्शनानेच होते. टेलिव्हिजन, मोबाईल, टॅब, लॅपटॉप सारख्या वेगवेगळ्या उपकरणांचा वापर प्रत्येकजण करत आहे. वर्क फॉर्म होम असेल किंवा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे असो. सतत समोर असते ती स्क्रीन. दिवसभर सतत स्क्रीन पाहण्यामुळे मानेवर ताण पडतोच पण त्या शिवाय डोळ्यांवर ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी वेळीच उपाययोजना केली नाही तर त्यांचे आरोग्यावर नकारात्मक दूरगामी परिणाम होऊ शकतात. (Eye Care Tips)

डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी… (Eye Care Tips)

१. २० – २० – २०

सलग काही तास स्क्रीन पाहण्याने डोळे शुष्क होण्याची दाट शक्यता असते. त्याासाठी डोळ्यांचे आरोग्य चटकन सुधारणारा हा व्यायाम प्रत्येकाने करून पाहिला पाहिजे. दर वीस मिनिटांनी एक छोटा ब्रेक घ्या. तेव्हा २० फूटवरच्या कोणत्याही वस्तूकडे २० सेकंदासाठी बघा. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करा. (Eye Care Tips)

२. लॅपटॉप आणि डोळ्यांतले अंतर

लहान मुलांना वारंवार सूचना दिली जाते की मोबाईल, टेलिव्हिजन जवळून पाहू नये. तिच गोष्ट मोठ्यांच्या लॅपटॉपच्या वापराला सुद्धा लागू होते. लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांपासून किमान २५ – ३० इंच दूर असली पाहिजे. (Eye Care Tips)

(हेही वाचा –  स्वस्तात फिरा नेपाळ! IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळणार अनेक सवलती)

३. स्क्रीन सेटिंग्ज

लॅपटॉपचा ब्राईटनेस जास्त असेल तर त्याचा त्रास निश्चितपणे डोळ्यांना होणार. त्यामुळे खोलीतल्या उजेडाला लक्षात घेऊन लॅपटॉपचा ब्राईटनेस कमी – जास्त करा. सेटिंग्जमध्ये नाईट मोड नामक एक पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय ऑन केल्यावर स्क्रीन पिवळसर रंगाची होते. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळू शकतो. (Eye Care Tips)

४. खोलीतला प्रकाश

अंधारात टक लावून स्क्रीन पाहण्याचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तितकाच विचार खोलीतला उजेड योग्य आहे की नाही या बद्दल करायला हवा. गरजेपेक्षा कमी उजेडाचा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त अंधाराचा डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे काही तास सलग काम करायला सुरुवात करण्यापूर्वी खोलीतला उजेड योग्य आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. (Eye Care Tips)

५. आहार

कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आजाराला दूर ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. समतोल आहार, नियमित व्यायामाने मानेचा त्रास, डोकेदुखी, शरीर जड होणे यासारख्या समस्या दूर होतात. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई देणाऱ्या घटकांचा समावेश करा. (Eye Care Tips)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.