फेसबूकचं पुन्हा होणार बारसं? लवकरच होणार निर्णय

133

सोशल मीडिया जायंट फेसबूक पुढच्या आठवड्यात नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत आहे. द व्हर्ज या वृत्तसंस्थेने मंगळवारी ही माहिती दिली आहे. फेसबूकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्याविषयी योजना आखत आहेत. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे व्हर्जच्या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचाः फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा बंद पाडणारा सापडला! कोण आहे ‘तो’?)

मेटावर्स कंपनी म्हणून ओळख बनवणार

येत्या काही वर्षांमध्ये लोकांनी फेसबूकला सोशल मीडिया कंपनीऐवजी मेटावर्स कंपनी म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मेटावर्स सोशल टेक्नोलॉजीचं खरं एक्सप्रेशन आहे. असे मार्क झुकरबर्ग जुलैमध्ये म्हणाले होते. अमेरिकन सरकार फेसबूकच्या व्यावसायिक कामकाजावर पाळत ठेवत आहे. तिथल्या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी कंपनीवर टीका केली आहे,. त्यामुळे फेसबूकबद्दल राग वाढत चालला आहे.

फेसबूक या गोष्टी रोखण्यास असमर्थ ठरत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम देखील काही तांत्रिक बिघाडामुळे पाच तासांपेक्षा जास्त काळ बंद झाले होते. फेसबूकचा मतभेद वाढवण्यासाठी, लोकशाही अस्थिर करण्यासाठी आणि तरुण मुली व स्त्रियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विनोद करण्यासाठी वापर केला जात आहे. फेसबूक या गोष्टी रोखण्यास असमर्थ ठरत आहे.

(हेही वाचाः आर्यन खानचे सर्च सजेशन गुगलवरुन झाले ‘गूल’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.