मेटा सीईओ मार्क झुकरबर्गसह अनेक युजर्सचे फॉलोवर्स झाले कमी, काय आहे कारण?

117

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्स अचानक कमी झाले आहेत. तसेच अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी सुद्धा त्यांचे फॉलोवर्स कमी झाल्याची तक्रार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका बगमुळे हे फॉलोवर्स कमी झाले आहेत. मार्क झुकरबर्ग यांचे फॉलोवर्स ११९ दशलक्ष होते, मात्र बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या फॉलोवर्सची संख्या ९ हजार ९९५ एवढी झाली आहे. अनेक युजर्स सोबत हा प्रकार घडला आहे. ट्विटरसह सोशल मिडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर फेसबूक वापरकर्त्यांनी फॉलोवर्स कमी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

( हेही वाचा : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; या आहेत प्रमुख मागण्या )

मेटाकडून डेटा चोरी झाल्याचा इशारा

यापूर्वी मंगळवारी ११ ऑक्टोबरला मेटाने आपल्या फेसबूक युजर्सचा डेटा चोरी झाल्याचा इशारा दिला होता. फोटो एडिटर, गेम्स, व्हीपीएन सेवा, बिझनेस आणि युटिलिटी अ‍ॅप्समध्ये अशा त्रुटी आढळल्या आहेत. दरम्यान मंगळवारी रशियाने इन्स्टाग्राम आणि फेसबूकची मूळ कंपनी मेटाचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. हे प्लॅटफॉर्म रशियाविरूद्ध अपप्रचार करत असल्यामुळे पुतीन यांनी मार्चमध्येच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बंदी घातली होती असे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेसबुक बगमुळे फॉलोवर्स घटले 

फेक फॉलोवर्स कमी झाले अशी चर्चा आहे परंतु अशी चर्चा रंगल्यावर मार्क झुकरबर्गचे सर्वच फॉलोवर्स फेक होते का असा प्रश्न उपस्थित होतो. फेसबुकच्या एका बगमुळे एका रात्रीत अनेकांचे फॉलोवर्स कमी झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतील युजर्सला सुद्धा याचा फटका बसला आहे. न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द हिल अशा अनेक माध्यामांचे फेसबुक फॉलोवर्स कमी झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.