रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखद; आता रेल्वे स्थानकावर मिळणार ‘ही’ अनोखी सुविधा

166

रेल्वेने बरेच प्रवासी रोजचा प्रवास करतात अनेकवेळा सकाळी इच्छितस्थळी दाखल होऊन संध्याकाळी लोक परतीच्या प्रवासासाठी निघतात. अशावेळी लोकांना आपले सामान घेऊन कामासाठी फिरावे लागतात. म्हणून भारतीय रेल्वे स्थानकांवर लवकरच डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करत आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्ये लवकरच डिजिटल लॉकर सुविधा सुरू होणार आहे.

( हेही वाचा : नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ )

लॉकर सुविधा सुरू करण्याची योजना 

नागपूर रेल्वे स्थानकावरून सुद्धा प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. यातील काही प्रवासी मुख्यत: व्यवसाय, नोकरी, खरेदीच्या निमित्ताने येतात. त्यामुळे औटघटकेचा मुक्काम असला की, सामान कुठे ठेवायचा हा मुख्य प्रश्न असतो. रेल्वे स्थानकांवर लॉकर सुविधा नसल्याने अनेकजण जास्त सामान सोबत असले तरी घेऊन जातात. रेल्वेगाडीच्या वेळा लक्षात घेता हे सामान त्यांना हॉटेल किंवा लॉजमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसतो. हा संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर डिजिटल लॉकरची सुविधा सुरू करण्याची कल्पना आणली आहे. ही सुविधा सुरू झाल्यास दररोज प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊन पैसे वाचवू शकतात. सामान लॉकरमध्ये ठेऊन विशिष्ट अवधीसाठी बाहेर जाता येईल.

नागपूर रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरू करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. परंतु या लॉकरसाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही. एकदा जागा निश्चित झाली की, लॉकर उभारणीला फारसा वेळ लागणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.