कांद्याने रडवले!

161

कांद्याच्या भावात राज्यात सध्या मोठी घसरण सुरू झाली आहे. उन्हाळ्यात कांद्याची आवक राज्यातील विविध बाजारात सुरू झाल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. कांद्याचे भाव चाकणच्या बाजारात नऊ रुपये प्रतिकिलो आहेत. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

कांद्याने शेतकऱ्यांना रडवले!

राज्यात पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादन घटले होते. परंतु यंदा उन्हाळी कांद्यांचे लागवड क्षेत्र पुणे, नगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मार्च महिन्यात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. यामुळेच कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

( हेही वाचा : पद्मश्री मिळालेल्या 125 वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे ‘हे’ आहे रहस्य! )

राज्यातील इतर बाजार समित्यांपेक्षा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक अधिकच आहे. दरात मात्र चढ-उतार असले तरी इतर बाजार समितींच्या तुलनेत कांद्याचे दर सर्वाधिक आहेत. लासलगाव बाजार समितीमध्ये प्रती क्विंटल ५०० ते ९६०, सोलापूर बाजार समितीमध्ये १०० ते १७००, येवला २५० ते १०७०, कोल्हापूर ४०० ते १४०० रुपये यासह इतर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याची पाहण्यास मिळाली आहे. निर्यांतबंदी व इतर कारणामुळे दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.