सध्या पनवेल, कर्जत या ठिकाणी फार्महाऊस घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक सेलिब्रिटी सेकंड होम किंवा व्यवसायाच्या दृष्टीने फार्महाऊसची निर्मिती करत आहेत. त्यामुळे तेथील भावही वाढले आहेत. ह्रतिक रोशन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, प्राजक्ता माळी यांच्या फार्महाऊसची नेहमीच चर्चा होत असते. या लेखामध्ये आपण या कलाकारांच्या फार्महाऊसची माहिती जाणून घेणार आहोत. (farmhouse in karjat)
कर्जत हे हिरवेगार आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते फार्महाऊस आणि रिट्रीटसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. इथे घनदाट झाडांनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या आहेत, जलकुंभ म्हणजेच अनेक तलाव आणि नद्या नयनरम्य दृश्य प्रदान करतात. विविध सेंद्रिय शेततळे आणि वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सेलिब्रिटींसाठी हे आकर्षणाचं केंद्र झालं आहे. तसेच वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी इथे आढळतात. त्यामुळे इथलं वातावरण मन प्रसन्न करणारं आहे. (farmhouse in karjat)
(हेही वाचा – shivneri fort : शिवनेरी किल्ल्याबद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)
उल्हास व्हॅली इथलं सौंदर्य वाढवते आणि धबधब्यांमुळे पावसाळ्यात वेगळीच मज्जा येते. कोंडाणा लेणी म्हणजे जटिल कोरीवकाम आणि स्तूप असलेली प्राचीन बौद्ध लेणी आहे. पेठ किल्ला म्हणजेच कोथळीगड हा ट्रेकिंगसाठी महत्त्वाचा किल्ला आहे. किल्ला लहान असला तरी ट्रेकर्नसा आकर्षित करतो. (farmhouse in karjat)
सलमान खानच्या मालकीचे पनवेलमध्ये एक आलिशान फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस “अर्पिता फार्म्स” म्हणून ओळखले जाते. फार्महाऊस १५० एकरमध्ये पसरलेले आहे. इथे प्रशस्त तीन बंगले आहेत. रिसॉर्ट-स्टाईल स्विमिंग पूल व अत्याधुनिक जिम आणि स्टेबल्स व घोडेस्वारी रिंक सुद्धा आहे. त्याचबरोबर ऑरगॅनिक फार्म देखील आहे. सलमानने लॉकडाऊन दरम्यान सेंद्रिय शेतात काम करतानाचे फोटो शेअर केले होते. (farmhouse in karjat)
(हेही वाचा – constable salary : भारतात constable ला किती असतो पगार?)
हृतिक रोशनचे कर्जतच्या शेजारी लोणावळ्यात एक सुंदर फार्महाऊस आहे. फार्महाऊस ५-७ एकरमध्ये पसरले आहे आणि सध्या त्याचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये चार बेडरूम, एक जिम, एक स्विमिंग पूल आणि सेंद्रिय शेतीसाठी जाता आहे. ऋतिक आणि त्याच्या कुटुंबाने सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याची लागवड करण्याच्या योजना आखल्या आहेत. (farmhouse in karjat)
अमिताभ बच्चन यांच्याकडे कर्जतमध्ये २८ एकरचे फार्महाऊस आहे, जे देवगण फार्म्स म्हणून ओळखले जाते. इथे ४५०० पपईची झाडे, २५०० केळीची झाडे, ५०० बोरा (हिरवी बेरी) झाडे आणि केसर व हापूस आंब्याच्या बागा आहेत. अमिताभ बच्चन यांनी पिकवलेल्या आंब्याला रायगड जिल्हा आंबा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. तसेच या फार्ममध्ये वांगी, भेंडी, मुळा आणि ताजे टोमॅटो यांसारख्या भाज्यांचे उत्पादन देखील केले जाते. (farmhouse in karjat)
(हेही वाचा – Double Hat – Trick in T20 : अर्जेंटिनाच्या फेनेलची टी-२० क्रिकेटमध्ये दुहेरी हॅट ट्रिक)
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीकडे कर्जतमध्ये एक भव्य फार्महाऊस आहे, ज्याचे नाव तिने प्राजक्तकुंज असे ठेवले आहे. ती म्हणाली होती की हे फार्महाऊस म्हणजे तिचं स्वप्न होतं. फार्महाऊस एका मोठ्या भूखंडावर पसरलेले आहे. इथलं वातावरण नैसर्गिक आणि शांत आहे. विशेष म्हणजे ही जागा पर्यटकांना भाड्याने दिली जाते. तुम्हालाही प्राजक्ता माळीच्या सुंदर फार्महाऊसमध्ये राहायचे असेल तर तुम्ही प्री-बुकिंग करु शकता. (farmhouse in karjat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community