fashion street camp pune कोणत्या कारणासाठी आहे प्रसिद्ध?

36
fashion street camp pune कोणत्या कारणासाठी आहे प्रसिद्ध?

पुणे कॅम्प ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली एक लष्करी छावणी आहे. १८१७ साली भारतीय लष्कराच्या सैन्याचा तळ ठोकण्यासाठी पुणे कॅम्पची स्थापना करण्यात आली होती. या कॅम्पमध्ये अनेक लष्करी आस्थापनं आहेत. पुणे कॅम्प हे खरेदीची ठिकाणे, एमजी रोड आणि ईस्ट स्ट्रीटसाठी देखील ओळखलं जातं. भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचे मुख्यालय पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आहे. तसंच भारतीय सशस्त्र दलाच्या सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण करणारी नॅशनल वॉर मेमोरियल दक्षिणी कमांडसुद्धा कॅम्पमध्ये आहे. (fashion street camp pune)

(हेही वाचा – star cement share price : star cement च्या share ची किंमत किती आहे?)

पुणे कॅम्पचा इतिहास

ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश-भारतीय सैन्याची खडकी येथे मुळा नदीच्या पश्चिमेला आधीच एक छोटी छावणी होती. पण आणखी सैन्य वाढवणं आवश्यक असल्याने मुठा नदीच्या पश्चिमेला सैन्याच्या छावणीसाठी एक मोठा प्रदेश व्यापला गेला. म्हणून ब्रिटिश-भारतीय सैन्याच्या सैनिकांना सामावून घेण्यासाठी १८१७ साली पुणे कॅम्पची स्थापना करण्यात आली. त्यासाठी मढी, मुंढेरी, वानोवरी आणि घोरपुरी या गावांची निवड करण्यात आली. सुरुवातीला, छावणीसाठी ४,६२० सैनिकांची चौकी आखण्यात आली होती. या चौकीमध्ये दोन युरोपियन रेजिमेंट, एक माउंटन बॅटरी, एक देशी घोडदळ आणि तीन देशी रेजिमेंटचा समावेश होता. प्रशिक्षण देण्यासाठी आणि कवायतींसाठी १३० एकरचा मध्यवर्ती पट्टा नेमण्यात आला होता. गोळीबार मैदान येथे गोळीबाराचा सराव करण्यासाठी रांगा होत्या.

कालांतराने सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या परिसरात स्थायिक व्हायला लागले. छावणीमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना नागरिक सेवा पुरवत असल्यामुळे हळूहळू हा कॅम्प वाढायला लागला. कॅम्पची सीमा १८२२ साली वाढवण्यात आली. पुढे १९६३ साली घोरपुरी गाव आणि फातिमा नगर हे कॅम्पच्या क्षेत्रात विलीन करण्यात आलं. त्याच वर्षी मुंढवा गावाचा छावणीत समावेश झाला आणि छावणीची सीमा आणखी मोठी झाली. (fashion street camp pune)

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : चेतेश्वर पुजाराच्या मते भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले पाहिजेत हे बदल)

सध्या पुणे कॅम्प इथलं फॅशन स्ट्रीट हे सामान्यांच्या खिशाला परवडणारे कपडे आणि ॲक्सेसरीजसाठी प्रसिद्ध आहे. फॅशन स्ट्रीट हे पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये एम. के. गांधी रोडवर आहे. या मार्केटमध्ये ग्राहक, तरुण आणि वृद्ध, स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी असते.

१९९७ साली पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि फॅशन स्ट्रीटमध्ये नव्याने आयोजित केलेल्या कॅम्प परिसरातल्या विक्रेत्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बाजारपेठेतील मूलभूत गरजांच्या विकासासाठी योजनांची रूपरेषा आखण्यात आली होती. या बाजारपेठेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे दुकानदार एका हेल्दी कॉम्पिटिशनचा भाग आहेत. तरीही गरज पडल्यास प्रत्येक जण एकमेकांना पाठिंबा देतात. (fashion street camp pune)

(हेही वाचा – purna wildlife : पूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये कोणकोणते प्राणी आणि जीव पाहायला मिळतात?)

पुणे व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष हरमोज पांडोळे हे आहेत. ते सर्व विक्रेत्यांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचं निराकरण करतात. याव्यतिरिक्त एमजी रोड हॉकर्स आणि पाथरीवाले असोसिएशन सेवा संस्था यांसारख्या संघटनाही या विक्रेत्यांच्या भल्यासाठी काम करतात.

या कॅम्प फॅशन स्ट्रीटमध्ये कपड्यांव्यतिरिक्त, काही ब्रँडेड आणि अनेक फर्स्ट कॉपी असलेल्या वस्तू, कीचेन, चष्मा, मोबाइल कव्हर, इलेक्ट्रॉनिक्स, शूज आणि उपकरणे देखील विकली जातात. विक्रेते जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आगामी सण आणि नवीनतम ट्रेंडच्या आधारे त्यांची दुकाने सजवतात. दर मंगळवार ते रविवार सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू असतात. सोमवारी हे मार्केट बंद असते. (fashion street camp pune)

सध्या फॅशन स्ट्रीटमध्ये ५६९ कायदेशीर आणि १५० अवैध स्टॉल्स आहेत. इथल्या गल्ल्या अतिशय अरुंद आहेत. इथे एका वेळी फक्त एक ते दोन लोक उभे राहू शकतात, तरीही ग्राहक आणि पर्यटक अतिशय उत्साहाने या पुणे कॅम्प फॅशन स्ट्रीटला भेट देतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.