सावध! डाएट आणि प्रोटीनसाठी सप्लिमेंट फूड खाताय? मग हे वाचा

मुंबईत एफडीएच्या कारवाईत कमी दर्जाचे फुड सप्लिमेंटवर कारवाई

85

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने कमी दर्जाचे फूड सप्लिमेंट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन, दक्षता व गुप्तवार्ता विभागास प्राप्त माहितीनुसार मेसर्स सिग्मा लाइफसायन्स, बंगलो भूखंड क्रमांक-204-244, आरएससी-41, गोराई 2, प्रगती शाळेसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-400092 या पेढीची ऑनलाईन तपासणी केली असता तेथे Health Supplements चे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein (Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चा उत्पादित करून ठेवलेला साठा आढळून आला.

अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन

या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चे अन्न नमुने घेवून Health Supplement 100% Whey Protein (Ammolabz) ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 76 जार (कंटेनर), 5,75,320/- रुपयेचा साठा तर Dietary Supplement Progenix Mass Addict ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 100 जार (कंटेनर), 1,45,000/- रुपयेचा साठा हा काही घटकांचे प्रमाण हे RDA पेक्षा जास्त असल्याने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे तसेच साठा कमीदर्जाचा असल्याच्या संशयावरून व जन आरोग्य हितार्थ जप्त करण्यात आला.

(हेही वाचा – सुशासन निर्देशांक अहवाल २०२१: देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी)

योग्य ती कार्यवाही होणार

अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.