कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि स्कुल फ्रॉम होम मुळे इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका डेटा आणि मार्केट रिसर्च फर्मने केलेल्या सर्व्हेनुसार, गेल्या दोन वर्षात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांनी बाजी मारल्याचे समजत आहे.
(हेही वाचा: फाळणीनंतरही RBI पाकिस्तानसाठी काम करत होती, काय होतं कारण?)
महिला आघाडीवर
गेल्या दोन वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत तब्बल 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या काळात पुरुषांच्या संख्या केवळ 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.त्यामुळे महिला इंटरनेट वापरातही पुरुषांच्या पुढे असल्याचे म्हटले जात आहे. देशात गेल्या दोन वर्षावरील इंटरनेट युजर्सची संख्या डिसेंबर 2021 पर्यंत 64 कोटी 60 लाख असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.
खेड्यांनी शहरांना टाकले मागे
2019 च्या तुलनेत खेड्यांमध्ये इंटरनेट वापरात 45 टक्क्यांची वाढ झाली असून, शहरांमध्ये ही वाढ केवळ 28 टक्के इतकी आहे. ग्रामीण भागांत इंटरनेट युजर्सची संख्या 35 कोटी 20 लाख इतकी असून, शहरी भागात 29 कोटी 40 लाख युजर्स आहेत. तर ग्रामीण भागातील तीनपैकी एक महिला इंटरनेटचा वापर करते.
(हेही वाचा: नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)
परवडणारे स्मार्टफोन आणि परवडणारा मोबाईल डेटा यामुळे इंटरनेट युजर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community