FIFA World Cup : अंतिम सामन्यात ट्रॉफीचे अनावरण करण्याचा मिळाला बहुमान, ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री

127

फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना कतारमध्ये १८ डिसेंबरला रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण करण्याचा बहुमान भारतातील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळणार आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही भारतातील पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली…)

पहिल्यांदाच भारतीय अभिनेत्री करणार ट्रॉफीचे अनावरण 

जगातील सर्वात मोठा सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अंतिम सामन्यात दीपिका पदुकोणच्या हस्ते अनावरण होणार आहे. यासाठी दीपिकाला खास आमंत्रण मिळाले आहे. फिफाचा अंतिम सामना येत्या १८ डिसेंबरला कतारमधील लुसैल स्टेडियमध्ये संपन्न होणार आहे. फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रॉफीचे अनावरण करण्याचा मान एका भारतीय अभिनेत्रीला दिला जाणार आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी मेंबर

याआधी दीपिकाची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी मेंबर म्हणून निवड करण्यात आली होती. यासोबतच दीपिका गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेनुसार जगातील सर्वात सुंदर महिला टॉप १० च्या यादीत समाविष्ट असणारी एकमेव महिला ठरली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.