तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग कोणी वाचत तर नाही ना? तात्काळ बदला या सेटिंग्ज

191

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात या अ‍ॅपचा वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवनवे अपडेट येत असतात. असाच अपडेट काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला आला यामुळे व्हॉट्सअ‍ॅप तुम्ही तुमच्या फोन व्यतिरिक्त अन्य चार डिव्हाइसवर एकाचवेळी वापरू शकता. परंतु एकाचवेळी अनेक फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन ठेवल्यामुळे तुमची खासगी माहिती, चॅटिंग उघड होण्याचा धोका असतो.

( हेही वाचा : आधार कार्डवर मराठीत अपडेट करा तुमची माहिती! जाणून घ्या प्रक्रिया )

खासगी माहिती, चॅटिंग उघड होऊ शकते

जर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक जागेवर लॉगिन असेल तर कोणताही व्यक्ती तुमचे खासगी चॅट वाचू शकतो. मल्टी डिव्हाइस फिचरमुळे अकाउंटला बऱ्याच वेळेपर्यंत लॉगिन ठेवता येऊ शकते. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप कुठे कुठे लॉगिन आहे याची खात्री सेंटिंग्ज मधून करा आणि गरज नसल्यास व्हॉट्सअ‍ॅप इतर डिव्हाइसवरून अनलिंक करा.

व्हॉट्सअ‍ॅप अनलिंक/लॉगआउट कसे कराल?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यावर उजव्या बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करा
  • या ठिकाणी तुम्हाला Linked device हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
  • इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप कुठे कुठे लॉगिन आहे याची माहिती मिळेल.
  • लॉगआउट करण्यासाठी दिलेल्या पर्यायांवर टॅप करा आणि इतर डिव्हाइसवरून logout व्हा.

New Project 1 16

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.