karanja या शहराला का मिळाली एवढी प्रसिद्धी?

23
karanja या शहराला का मिळाली एवढी प्रसिद्धी?

कारंजा (karanja) हे भारतातल्या महाराष्ट्र राज्यामधलं वाशिम जिल्ह्यात असलेलं एक शहर आहे. या शहराचं नाव संत कारंज यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. तसंच या शहरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म झाला होता. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आहेत.

कारंजा शहराविषयी अधिक माहिती

कारंजा (karanja) शहर हे एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. तसंच या शहराला ऐतिहासिक महत्त्वही आहे. श्री मुलसंघ चंद्रनाथ स्वामी यांचं जैन मंदिर, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं गुरु मंदिर याच शहरात आहे. यांसारखीच अनेक प्राचीन मंदिरं या शहरात आहे.

तसंच कारंजा (karanja) हे शहर निसर्गरम्य सौंदर्यासाठी देखील ओळखलं जातं. हे संपूर्ण शहरामध्ये हिरव्यागार टेकड्या, सुपीक शेते आणि वळणदार नद्या पाहायला मिळतात. हे शहर सुपीक शेतजमिनीच्या मधोमध वसलेलं आहे आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं आहे.

(हेही वाचा – Drugs : गुजरात एटीएस व एनसीबीची पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई; 500 किलो ड्रग्जसह 8 जणांना अटक)

कारंजा शहरातली प्रसिद्ध मंदिरे

कारंजा (karanja) हे शहर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आहेत. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म १३७८ साली कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रवास केला. त्यांनी आपल्या साधनेने संतपद प्राप्त केलं.

आपल्या शिष्यांना त्यांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं. त्यांच्या शिष्यांपैकी अनेकांनी संतपद प्राप्त केलं. गेल्या सुमारे १०० वर्षांमध्ये गुरुमंदिर हे महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी केंद्रस्थान बनले आहे.

याव्यतिरिक्त कारंजा या शहरात विठ्ठल मंदिर, छोटं राम मंदिर आणि प्रसिद्ध कन्नाव राम मंदिर अशी इतरही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये दरवर्षी रामनवमी आणि इतर हिंदू धार्मिक कार्यक्रम केले जातात.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : तर अजित पवारही बनू शकतील मुख्यमंत्री!)

कारंजा (karanja) शहर हे भारतातलं एकमेव ठिकाण आहे, जिथे तीन दिगंबर जैन परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन भटारकांचा संघ आहे. बालटकर गण, सेना गण आणि काष्ठ संघ अशी या तीन भटारकर संघाची नावं आहेत. तसंच या शहरामध्ये चार प्रमुख दिगंबर जैन मंदिरं आहेत.

काष्ठ संघ मंदिरात १४ व्या शतकातलं अप्रतिम लाकडी कोरीव कामाचा नमुना पाहायला मिळतो. सेना गण मंदिरामध्ये जैन तीर्थंकरांच्या पंचकल्याणक समारंभाचं चित्रण करणारी पॅट म्हणजेच स्क्रोल पेंटिंग आहे. हे स्क्रोल पेंटिंग राजस्थानी शैलीत रंगवलेलं असून ते जवळपास ८०० वर्षं जुनं आहे. बालटकर गण मंदिरामध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आहे. १९२६ साली प्राचार्य हिरालाल जैन यांना या ठिकाणी १२ अज्ञात अपभ्रंश हस्तलिखितं सापडली होती. ती हस्तलिखिते नंतर संपादन करून प्रकाशित करण्यात आली होती.

कारंजा हे शहर जैन धर्माची “काशी” म्हणून ओळखलं जातं. इथलं महावीर ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच गुरुकुल देखील प्रसिद्ध आहे. कारंजा हे शहर आचार्य समंतभद्र यांनी स्थापन केलेल्या ११ गुरुकुलांपैकी पहिल्या गुरुकुलाची संस्था असलेलं शहर आहे.

(हेही वाचा – Assembly Election : मतदान केंद्र परिसरात स्वच्छता, पाणी आणि शौचालयांच्या सुविधेसाठी महापालिकेचा पैसा)

कारंजा शहरातलं ऐतिहासिक ठिकाण : कन्नाव मॅन्शन

१९०५ साली बांधण्यात आलेलं कन्नाव मॅन्शन हे फ्रेंच/इटालियन आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना आहे. कन्नाओ मॅन्शन ही श्रीलंका इथल्या क्वीन बंगल्याची प्रतिकृती आहे. ही वास्तू शतकापेक्षा जास्त जुनी आहे.

कन्नाव मॅन्शनला ३०७ दरवाजे आहेत. मुघलांच्या काळात सुभानखान याने कारंजा (karanja) शहरच्या भोवती एक भिंत उभी केली होती. त्या भिंतीला दिल्ली दरवाजा, दारव्हा दरवाजा, मंगरूळ दरवाजा आणि पोहा दरवाजा असे चार दरवाजे होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.