फिनलॅंड या देशाने वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स म्हणजेच जगातील आनंदी देशांच्या यादीत सलग पाचवेळा पहिला क्रमांक पटकावला आहे. १४६ देशांच्या यादीत सर्वात आनंदी देश फिनलॅंड असून त्यामागोमाग डेन्मार्कचा दुसऱ्या आणि आइसलॅंड देश तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या यादीत सर्वाधिक दु:खी देश म्हणून अफगाणिस्तान शेवटच्या १४६ व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताचा १३६ वा क्रमांक आहे तर पाकिस्तान १०३ व्या स्थानावर आहे.
( हेही वाचा : राज्यात उन्हाचा तडाखा पण, ‘या’ भागात पावसाचा इशारा )
अफगाणिस्तान सर्वात दु:खी देश
संयुक्त राष्ट्रांच्या वतीने वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. या अहवालाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. यात लोकांच्या आनंदाचे, आर्थिक आणि सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य, त्यांचे स्वास्थ्य, भ्रष्टाचाराची पातळी आणि एकूण देशांतर्गत उत्पादन यानुसार विश्लेषण केले जाते. अफगाणिस्तानवर तालिबानने आक्रमण केल्यापासून तिथे अनेक समस्या निर्माण होऊन सामान्य लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे हा अफगाणिस्तान हा देश या यादीत सर्वात तळाशी आहे. या यादीत अमेरिकेने १६ वे स्थान पटकावले आहे तर, ब्रिटन १७ व्या आणि फ्रान्स २० व्या स्थानावर आहे.
सर्वांत आनंदी देश
फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लक्झेंम्बर्ग, स्वीडन
भारताशेजारील देश
- पाकिस्तान -१०३
- चीन -८२
- श्रीलंका – १२६
- बांग्लादेश – ९९
- नेपाळ -८५