रेल्वेला भारतीयांची लाईफलाईन असे समजले जाते. भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. भारतीय गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे कोच, बोगी लावण्यात आल्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे की, कोणत्या ट्रेनमध्ये AC कोच पहिल्यांदा लावला गेला? या ट्रेनविषयी आपण माहिती घेऊया…
( हेही वाचा : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; मिळणार ४० हजारापर्यंत पगार )
भारतातील पहिली एसी ट्रेन 93 वर्षांपूर्वी 1 सप्टेंबर 1928 रोजी सुरू झाली आणि तिचे नाव फ्रंटियर मेल होते. पूर्वी या ट्रेनचे नाव पंजाब एक्सप्रेस होते. या ट्रेनमध्ये 1934 साली एसी कोच जोडण्यात आले, त्यानंतर त्याचे नाव बदलून फ्रंटियर मेल करण्यात आले. त्याकाळी ती राजधानी ट्रेनसारखी होती.
ट्रेन कशी थंड झाली ते जाणून घ्या
सध्या एसी डब्यांना थंड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मात्र त्यावेळी तसे नव्हते. त्यावेळी ट्रेनमध्ये बर्फाचे गोळे ठेवून डबे थंड ठेवण्यात आले होते. एसी डब्याखालील बॉक्समध्ये बर्फ ठेवण्यात आला आणि त्यानंतर पंखा बसवण्यात आला. या पंख्याच्या मदतीने एसी कोच थंड करण्यात आला.
ट्रेन कुठून कुठे धावायची ते जाणून घ्या
भारतातील पहिली एसी ट्रेन फ्रंटियर मेल मुंबई ते अफगाणिस्तान सीमेपर्यंत धावली. ब्रिटीश अधिकाऱ्यांशिवाय स्वातंत्र्यसैनिकही या ट्रेनमधून प्रवास करत असत. ही ट्रेन दिल्ली, पंजाब आणि लाहोरमार्गे ७२ तासांत पेशावरला पोहोचायची. प्रवासादरम्यान, वेगवेगळ्या स्थानकांवर वितळलेला बर्फ काढून टाकण्यात आला आणि त्यात नवीन बर्फाचे गोळे ठेवण्यात आले.
या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती वेळेवर धावली आणि या ट्रेनला कधीही उशीर झाला नाही. ट्रेन लेट झाली की ड्रायव्हरला जाब विचारला जायचा, 1940 पर्यंत या ट्रेनमध्ये 6 डबे होते आणि सुमारे 450 लोक प्रवास करत होते. स्वातंत्र्यानंतर ही ट्रेन मुंबई ते अमृतसरपर्यंत धावू लागली. 1996 मध्ये या ट्रेनचे नाव बदलून गोल्डन टेंपल मेल असे करण्यात आले.
Join Our WhatsApp Community