Fisker Ocean : फिस्कर ओशन ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच होणार?

फिस्कर ओशन ही अमेरिकन स्टार्ट अप इलेक्ट्रिक कार अलीकडेच भारतीय रस्त्यांवरही दिसली होती. 

239
Fisker Ocean : फिस्कर ओशन ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच होणार?
  • ऋजुता लुकतुके

टेस्ला कंपनीने काही वर्षांपूर्वी अमेरिकन बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्वयंचलित कार आणून प्रवेश केला आणि मागोमाग इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठच काही काळ खावून टाकली. त्यानंतर तिथल्या इतर कंपन्यांनाही इलेक्ट्रिक कार उत्पादनाचे वेध लागले. तर नवीन कंपन्या या क्षेत्रात येऊ लागल्या. यातलीच एक स्टार्ट अप कंपनी म्हणजे फिस्कर ओशन (Fisker Ocean). कोरोनाच्या आधी २०१९ मध्ये ही कंपनी लाँच झाली. आणि मागोमाग कंपनीने ओशन ब्रँडची आपली इलेक्ट्रिक एसयुव्ही बाजारातही आणली. (Fisker Ocean)

आणि विशेष म्हणजे अलीकडेच ही कार भारतीय रस्त्यांवरही धावताना लोकांना दिसली आहे. त्यामुळे फिस्कर ओशन (Fisker Ocean) भारतात येणार की काय अशी उत्सुकता जाणकारांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीच तशी बातमी अनेकांनी दिली होती. (Fisker Ocean)

(हेही वाचा – Ishan Kishan : इशान किशनची रणजी सामन्याला पुन्हा एकदा दांडी)

फिस्कर ओशन (Fisker Ocean) गाडी ही पूर्णपणे आयात केलेली असेल. आणि तिचं सीबीयू मॉडेल भारतात येण्याची शक्यता आहे. आयात करावर कुठलीही सवलत सरकारकडून मिळाली नाही तर या गाडीची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात असेल. (Fisker Ocean)

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात फिस्कर (Fisker Ocean) कंपनीने आपलं भारतातील कार्यालय तेलंगाणात हैद्राबाद इथं सुरू केलं आहे. आणि या कंपनीचं नाव फिस्कर विज्ञान असं ठेवण्यात आलं आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक अशी ही एसयुव्ही स्पोर्ट्स, अल्ट्रा आणि एक्सट्रिम अशा तीन प्रकारात येते. पैकी सगळ्यात वरची एक्सट्रीम श्रेणी भारतात आणली जाईल अशी चर्चा आहे. तसं झालं तर एका चार्जमध्ये ५७० किमींचं अंतर कापण्याची या गाडीची क्षमता आहे. (Fisker Ocean)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.