महाराष्ट्रात अनेक समुद्री किल्ले आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्यांना भेट देत आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जाणून घेत असतात. अशाच काही महत्वपूर्ण किल्ल्यांची माहिती आपण आज घेणार आहोत.
महाराष्ट्रातील टॉप 5 समुद्री किल्ले
1.सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील मालवणच्या किनाऱ्यालगत देवगड या गावात आहे. हा मराठा साम्राज्यातील सर्वात मोठा आणि सुस्थितीत असलेला किल्ला आहे. या किल्ल्यात अनेक गुप्तमार्ग असून, येथील गाईड आपल्याला संपूर्ण किल्ल्याची अचूक माहिती सांगतात.
( हेही वाचा : संपूर्ण लसीकरण झालेले भारतीय ‘या’ 7 देशात जाऊ शकतात! )
2. खांदेरी-उंदेरी
महाराष्ट्र सरकारने १७ व्या शतकातील मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १४ किल्ल्यांचे नामांकन केले असून खांदेरी किल्ला हा त्याचाच एक भाग आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने तुम्ही खांदेरीला जाण्यासाठी जेटी घेऊ शकता. पण, उंदरी येथे जाण्यासाठी जेट्टी उपलब्ध नसून केवळ कमी भरतीच्या वेळीच या किल्ल्यावर जाता येते.
3. विजयदुर्ग
कोकण किनारपट्टीवर वसलेला विजयदुर्ग हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यात प्रदर्शनासाठी काही जुन्या तोफा आणि तोफगोळे ठेवले आहेत. यात जुनी पाण्याची टाकी आणि तुरुंगाचेही अवशेष आहेत. मात्र, या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या भिंतीवरून दिसणारा निळ्याशार समुद्राचे दृष्य खरोखरच नयनरम्य आहे. कणकवली हे या किल्ल्यापासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
4. कुलाबा किल्ला
कुलाबा किल्ला हा अलिबागमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. किल्ल्यातील वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे किल्ल्याच्या आत एक मंदिर आहे, जे राघोजी आंग्रे यांनी 1759 मध्ये बांधले होते. हे मंदिर सिद्धिविनायक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 1 किमी अंतरावर आहे, तुम्ही एकतर किल्ल्यापर्यंत चालत जाऊ शकता किंवा तिथे जाण्यासाठी बोटीचा वापर करू शकता.
5. मुरुड-जंजिरा किल्ला
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले ५०० वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत असलेला आकर्षक आणि अजिंक्य किल्ला म्हणजे जंजिरा. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा किल्ला कायम अभेद्य होता.