आपल्या भारतात सर्वाधिक पोस्ट ऑफिस आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का? भारतात जगातील पहिले तरंगणारे पोस्ट ऑफिस सुद्धा आहे. हे पोस्ट ऑफिस २०० वर्षांपासून बोटीवर तरंगत असून श्रीनगरमध्ये आहे. जाणून घेऊया या पोस्ट ऑफिसबद्दल काही खास गोष्टी…
ब्रिटीश काळात सुरू झालेले हे पोस्ट ऑफिस
या पोस्ट ऑफिसचे पूर्वी नाव “नेहरू पार्क पोस्ट ऑफिस” होते, परंतु 2011 मध्ये त्याचे नाव बदलून “फ्लोटिंग पोस्ट ऑफिस” असे करण्यात आले. हे पोस्ट ऑफिस श्रीनगरच्या दल लेकमध्ये आहे.
येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. निशात शालीमार, गुलमर्ग येथे जाणारे पर्यटकसुद्धा या पोस्ट ऑफिसला आवर्जून भेट देतात. हे पोस्ट ऑफिस हाऊसबोटमध्ये असून यात दोन खोल्या आहेत. एका खोलीत पोस्ट ऑफिस चालवले जाते, तर दुसरी खोली एक संग्रहालय आहे ज्यामध्ये भारतीय पोस्टच्या इतिहासाशी संबंधित सामग्री ठेवलेली आहे.
दल लेकच्या परिसरात रम्य आणि आरोग्यदायी वातावरण आहे. मी एका दिवसात सुमारे १०० ते १५० पत्रे वितरीत करतो. येथे सीआरपीएफ कॅम्प देखील आहे. त्यांच्यासाठी सुद्धा बरीच पत्रे येतात. अशी माहिती येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वृत्तवाहिन्यांना दिली आहे. तसेच अलिकडे इंटरनेट आणि सोशल मिडियामुळे पत्र लिहिण्याचे प्रमाण कमी झाले आहे असेही त्याने नमूद केले आहे.