मुंबईतील ‘बॅरोमीटर बुश’ ला आला फुलोरा… काय आहे फुलांचे वैशिष्ट्य? वाचा…

या झाडांना बहर आल्यानंतर काही दिवसांतच पावसाला सुरुवात होते असेही सांगितले जाते.

103

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळ असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकामधील वाहतूक बेटावर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे ‘ल्युकोफायलम’ या सुशोभीकरणासाठी काही महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या रोपांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे. आता या रोपांना आलेली आकर्षक फुले मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काय आहे फुलांचे वैशिष्ट्य?

या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या फुलांचा मुख्य बहर हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही असतो. या झाडांना बहर आल्यानंतर काही दिवसांतच पावसाला सुरुवात होते असेही सांगितले जाते. त्यामुळे या झाडांना ‘बॅरोमीटर बुश’ या टोपण नावाने जगभरात ओळखले जाते. ही वनस्पती मूलत: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे.

IMG 20210528 WA0086

(हेही वाचाः राणीबागेत आता मगर, सुसर यांना जवळून न्याहाळता येणार!)

पर्यावरणपूरक वनस्पतींचे रोपण

मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे महापालिका क्षेत्रातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये पर्यावरणपूरक सुशोभीकरण केले जाते. या अंतर्गत सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने आकर्षक फुले येणा-या किंवा आकर्षक पाने असणाऱ्या वनस्पती लावल्या जातात. यानुसार ‘ए’ विभागांतर्गत असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील वाहतूक बेटावर ‘ल्यूकोफायलम’ची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना मार्च ते नोव्हेंबर या काळात फुले येत असली, तरी फुलांचा मोठा बहर हा पावसाळ्यापूर्वी येतो, अशीही माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.