अद्भूत! मुंबई-ठाणे परिसरात पहिले हवेत तरंगणारे रेस्टॉरंट; Sky डायनिंगमध्ये घ्या जेवणाचा आनंद, किती असणार दर?

सध्या भारतात Flying रेस्टॉरंट ट्रेंड सुरू आहे. साधारण १५० ते १७० फूट उंचीवर बसून जेवणाचा आनंद घ्यायला कोणाला नाही आवडणार? गोवा आणि नोएडानंतर हिमाचल प्रदेशात मनाली येथे हे सुंदर Flying रेस्टॉरंट सुरू झाले आहे. हे देशातील तिसरे आणि हिमाचलमधील पहिले फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट आहे. इथे जेवणासोबत पर्यटकांना १७० फूट उंचीवरून निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे. तसेच अलिकडेच मुंबई-ठाणे परिसरात प्रथमच भिवंडी तालुक्यातील अंजुर येथे हवेत तरंगणारे रेस्टॉरंट सुरू झाले आहे.

( हेही वाचा : …तर २८ नोव्हेंबरपासून पुण्यात धावणार नाही रिक्षा! संघटनांनी दिला थेट इशारा )

फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये एकावेळी २२ लोक बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. भिवंडीतील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये हे रेस्टॉरंट यशस्वीपणे सुरू झाले असून या प्रकल्पाबद्दल राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या Flying रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना एकदाच ऑर्डर द्यावी लागेल. हवेत गेल्यावर मध्येच ऑर्डर करता येणार नाही. डायनिंग टेबलच्या सीट अशाप्रकारे डिझाईन केल्या आहेत की, तुम्हाला ३६० अंशातून आजूबाजूचा परिसर पाहता येईल.

दरपत्रक

  • दुपारचे जेवण – २ हजार ९९९ रुपये
  • सायंकाळ सूर्यास्त दरम्यानचा स्लॉट – ३ हजार ९९९ रुपये
  • रात्रीचे जेवण – ४ हजार ५०० रुपये

( या दरांमध्ये सीझनप्रमाणे बदल होऊ शकतो)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here