मोबाईलच्या बॅटरीचं आयुष्य वाढवायचंय… मग पाळा चार्जिंगचे ‘हे’ नियम

143

चार्जिंगच्या एका चुकीच्या सवयीमुळे तुमच्या गॅझेटला मोठी हानी पोहोचू शकते आणि या सवयीमुळे सर्व लिथियम बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते. बॅटरीच्या दीर्घ आयुष्यासाठी काय करावे ते जाणून घ्या….

मोबाईल बॅटरी कधी चार्ज करावी

बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी सर्व उपकरणे ठराविक प्रकारे डिझाइन आणि तयार केली जातात. बॅटरी २० टक्क्यांपेक्षा खाली आल्यास चार्जिंग करा आणि ८० टक्के झाल्यास चार्जिंग थांबवा. तसेच आवश्यक नसल्यास फास्ट चार्जिंगचा पर्यायही टाळा. यासह रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणे देखील आवर्जून टाळा. जास्त गरम झाल्यास बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच, ओलाव्याच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करा.

(हेही वाचा – सावधान! CoWIN पोर्टलवरील तुमचा डेटा असुरक्षित? आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ)

चार्जिंग करताना घ्या, ही खबरदारी

अनेक गॅझेट्सच्या चार्जिंग पद्धती अधिक स्मार्ट झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत. ‘ऑप्टिमाइज्ड बॅटरी चार्जिंग नावाचे आयफोनमधील फीचर तुमची दिनचर्या ट्रॅक करू शकते आणि स्वयंचलितपणे चार्जिंग शेड्यूल करते. १०० टक्के चार्जिंगनंतरही बॅटरीला प्लग लावून ठेवणे बॅटरीची क्षमता कमी होते. शून्य टक्के बॅटरी होणार नाही याचीही काळजी घ्या. चार्जिंग पूर्ण संपल्यास बॅटरीवर दबाव येतो व ती खराब होते. त्यामुळे २० टक्क्यांखाली चार्जिंग येता कामा नये.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.